Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Goa Highway: कशेडी बोगदा नव्हे तर पाण्याचा धबधबा! गणेशोत्सव तोंडावर पण प्रशासन ढिम्म

Mumbai - Goa Highway: गणेशोत्सव काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने हा प्रश्न केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने न सोडवता कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करणे आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 04:37 PM
mumbai goa highway

mumbai goa highway

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपाय निष्फळः
  • छतासह भिंतींमधून गळतेय पाणी 
  • पावसात उपाययोजनांची प्रभावीता अपुरी
देवेंद्र जाधव/खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याची गळती थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतरही पाण्याचा पाझर सुरूच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात बोगद्याच्या छतासह भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याने बोगद्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर तसेच इतर भागांतून लाखो चाकरमानी (Mumbai Goa Highway) कोकणात दाखल होणार असल्याने या गळतीमुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कशेडी घाटातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले असले, तरी पावसाळ्यातील पाणीगळतीचा प्रश्न अद्याप कायम आहे. बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींवरून ठिकठिकाणी पाण्याचे फवारे रस्त्यावर पडत असल्याने आतील रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे.

Kashedi Tunnel: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी वाचाच…

गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित कंत्राटदार कंपनीकडून विविध तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या तज्ज्ञांकडून सर्वेक्षण, केमिकल ग्राऊंटिंग, ड्रेनेज व पन्हाळी व्यवस्था, वॉटरप्रूफिंग, पीव्हीसी मेम्ब्रेन तसेच फायबर शीटचे अस्तर अशा उपायांचा अवलंब करण्यात आला. मात्र, मुसळधार पावसात या उपाययोजनांची प्रभावीता अपुरी ठरत असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. बोगद्यातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यास रस्त्यावर पाणी साचण्याबरोबरच वाहनांच्या टायरची पकड कमी होण्याची शक्यता असते.

गणेशोत्सव काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने हा प्रश्न केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने न सोडवता कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करणे आवश्यक आहे. कशेडी बोगदा सुमारे ५०२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा भाग असून, २ समांतर बोगद्यांची लांबी प्रत्येकी सुमारे २ किलोमीटर आहे. बोगद्यांना जोडणाऱ्या अॅप्रोच रोडसह संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे ९ कि. मी. आहे. एवढ्या मोठ्या खर्चाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात पाणीगळतीसारखा मूलभूत प्रश्न कायम राहणे ही चिंतेची बाब असल्याची भावना वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

४५ मिनिटांचा प्रवास फक्त ८ मिनिटांत; कोकणचा प्रवास होणार वेगवान

कशेडी बोगदा व जोडरस्त्यांच्या मूळ प्रकल्पासाठी सुमारे ५०२ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. गळती रोखण्याचे काम दोष दायित्व कालावधीअंतर्गत येत असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्वतंत्र अतिरिक्त खर्च घोषित केलेला नाही.

Web Title: Khed kashedi tunnel water leakage mumbai goa highway ganeshotsav travel risk 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • ganeshostav
  • Khed News
  • Kokan News
  • Mumbai Goa Express Way

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.