Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Ganeshotsav 2026: मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला आणि ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्त कोकणाकडे रवाना झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 05:44 PM
गणेशोत्सव 2026

गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • १५०० हून अधिक भाविक कोकणाकडे रवाना
  • ऑगस्ट क्रांती मैदान येथून ५ बसेसचे कोकणाकडे प्रस्थान
  • २०० हून अधिक भाविकांनी बसने केला प्रवास
मुंबई/Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष ‘नमो एक्स्प्रेस’ची व्यवस्था केली. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वरून सकाळी ११ वाजून ५ मिनिटाने ट्रेन कोकणाकडे धावली. मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला आणि ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्त कोकणाकडे रवाना झाले.

‘नमो एक्स्प्रेस’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत धावणार असून, गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आपल्या कुटुंबीयांसोबत आणि गावच्या बाप्पासोबत गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याचा आनंद प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हक्काचे आसन मिळाल्यानंतर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. विशेष रेल्वे रवाना होताच संपूर्ण स्थानक परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. बाप्पाच्या आगमनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदाला यावेळी अक्षरशः उधाण आले होते.

गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाता यावे, आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करता यावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. गणेशोत्सव जवळ येताच प्रत्येक मुंबईकराला आपल्या गावाची आणि आपल्या माणसांची ओढ लागते. हीच भावनिक नाळ लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे आणि बससेवेची व्यवस्था करण्यात येते. मुंबईतून कोकणाकडे रवाना होताना गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजता भाजपच्या वतीने आणखी एका विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच विशेष बस रवाना करण्यात आल्या. दक्षिण मुंबई परिसरातील सुमारे २०० चाकरमान्यांनी या बसमधून प्रवास केला. ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोषाने बस कोकणाकडे धावली.

Web Title: Mangal prabhat lodha amit satam namo express csmt to sawantwadi ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Indian Railway
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
1

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा
2

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
3

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
4

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.