Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्रीच्या कुशीतला ‘स्वर्ग’; डोंगर दऱ्यांतील Raghuveer घाटात यंदा पर्यटनाला ब्रेक

रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 03:51 PM
सह्याद्रीच्या कुशीतला ‘स्वर्ग’; डोंगर दऱ्यांतील Raghuveer घाटात यंदा पर्यटनाला ब्रेक
Follow Us
Follow Us:
  • डोंगर दऱ्यांतील रघुवीर घाटात यंदा पर्यटनाला ब्रेक
  • मुसळधार पावसाने अनेक दरड कोसळीच्या घटना
  • रघुवीर घाट पर्यटकांचे मुख्य आकर्षण 
देवेंद्र जाधव/ खेड: कोकणात पावसाची चाहूल लागताच सह्याद्री नव्या रूपात खुलतो. डोंगररांगा हिरव्या शालीने नटतात, कडेकपारींमधून शुभ्र जलधारा कोसळू लागतात आणि दाट धुक्याची चादर संपूर्ण परिसराला रहस्यमय रूप देते. या निसर्गोत्सवाचा सर्वांत मोहक अविष्कार पाहायचा असेल, तर खेड तालुक्यातील रघुवीर घाट हे निसर्गप्रेमींसाठी स्वप्नवत ठिकाण ठरते. खेड शहरापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर खोपीमार्गे असलेला हा घाट पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गात रूपांतरित होतो. समुद्रसपाटीपासून सुमारे ७६० मीटर उंचीवर आणि १४ किलोमीटर लांबीचा हा घाट सह्याद्रीच्या कुशीतून वळणावळणाने पुढे सरकतो. एका बाजूला खोल दऱ्या, दुसऱ्या बाजूला आकाशाला भिडणारे कडे आणि मधोमध धुक्यात हरवलेला रस्ता है दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमचे घर करून जाते.

१४ गावांचा एक जीवनदुवा

रघुवीर घाटाचे खरे सौंदर्य पावसाळ्यातच खुलते, डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे २७ हून अधिक नैसर्गिक धबधबे, सतत बरसणारा पाऊस, थंडगार वारे आणि दाट धुक्यात हरवलेली निसर्गरम्य वाट प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवते. फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या सान्निध्यात चिंब भिजण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यामुळेच दरवर्षी हजारो पर्यटक या घाटाकडे आकर्षित होतात. रघुवीर घाट हा केवळ पर्यटनस्थळ नाही, तर कांदोटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी अशा १४ गावांचा जीवनदुवा आहे.

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

अत्यंत महत्त्वाचा मार्ग
महाबळेश्वर तालुक्याशी जोडणारा हा माम स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र यंदाच्या मुसळधार पावसाने या निसर्गरम्य घाटालाही मोठा फटका बसला आहे. अनेका ठिकाणी दरडी कोसळल्या असून रस्ते खचल आहेत. मोठमोठे दगड आणि मातीचा भराब रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक गावे सपर्कहीन झाली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनान घाटातील पर्यटनाला १० ऑगस्टपर्यंत बंदी घातल आहे. रघुवीर घाटाचे सौंदर्य जितके मोहक तितकेच ते धोकादायकही आहे. मुसळधा पावसात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने या परिसरात सुरक्षिततेला सर्वोच् प्राधान्य दिले जात आहे.

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत पर्यटकांनी रघुवीर घाटात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Number of tourists visiting raghuvir ghat dropped due to landslides during the monsoon season khed konkan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Khed News
  • Tourism news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.