वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ...! गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
हिंदू धर्मात गणपती बाप्पाला ‘प्रथम पूजनीय’ आणि ‘विघ्नहर्ता’ मानले जाते. बाप्पाची पूजा करून शुभ कार्याची सुरुवात केली जाते. दरवर्षी दोन वेळा गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. एक म्हणजे भाद्रपद महिन्यात आणि दुसरा माघ महिन्यात. माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला ‘गणेश जयंती’ किंवा ‘माघी गणेशोत्सव’ असे म्हंटले जाते. हा दिवस गणपती बाप्पाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.असे मानले जाते की, गणेशाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 10000 पटीने अधिक कार्यरत असते. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या पोटी गणरायाने ‘महोत्कट विनायक’ अवतारात जन्म घेतला होता. हा अवतार त्यांनी देवांतक आणि नरांतक राक्षासाचा वध करण्यासाठी घेतला होता, असे मानले जाते. गणपती बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही नातेवाईकांना भक्तिमय शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)
250 वर्षे जुने आहे देवी तारा मातेचे ‘हे’ मंदिर, गुप्त नवरात्रीत केले जातात अनुष्ठान
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत माघी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ।।
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
अवघी सुष्टी करतेय नमन
होतयं माझ्या बाप्पाचे आगमन
।। गणपती बाप्पा मोरया।।
बाप्पाच्या आगमनाला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून – थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना…
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला बाप्पा का म्हणतात? मूळ शब्द आला …
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !
ॐ गं गणपतये नमः! माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वावर बाप्पाचे आगमन आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो.






