कोकणातील रेल्वे स्टेशनवर गर्दी (फोटो- सोशल मिडिया)
राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेसही, खासगी बसेस सुद्धा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. अवध्या कोकणाचे आराध्यदैवत असलेल्या गणपती चाप्पाच्या उत्सवासाठी लाखो गणेशभक्त दरवर्षी कोकणात येत असतात. कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने ३६० फेऱ्या सोडल्या होत्या. या विशेष रेल्वे फेऱ्यांमधून आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे सहा लाखांहून अधिक भक्त कोकणात दाखल झाले होते. मुंबईकरांची गर्दी लक्षात घेऊन गौरीच्या सणासाठी १७सप्टेंबरपर्यंत आणखी चार रेल्वे फेऱ्यांची भर घालण्यात आली होती.
‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
आता परतीचा प्रवास सुरू झाला असून १४ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले होते. काहींचे गणपती दीड दिवसाचे असल्याने १५ सप्टेंबर रोजी विसर्जन झाल्यानंतर लगेचच परतीचा प्रवास सुरू झाला. १६ सप्टेंबरपासून कोकणातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी अधिकच वाढू लागली आहे. शुक्रवारी पाच दिवसांच्या तर शनिवारी सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर गर्दीचा ताण वाढला. ही गर्दी सोमवारी (२० सप्टेंबर) पर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काहींचे गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत (शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर) असल्याने पुढील काळातही गर्दी राहील.
पुढे २६ आणि २७ सप्टेंबरदरम्यान परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व काळात प्रवाशांना सुरक्षित व सुकर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. चाकरमान्यांच्या प्रचंड गर्दीचे चोखा नियोजन करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून परतीसाठी १८२ विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.
Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर रोड या महत्वाच्या स्थानकांवरून सुटणाऱ्या सर्व गाडधा तुडुंब भरून धावत आहेत. सर्वच स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिस गर्दी नियंत्रणासाठी अहोरात्र तैनात करण्यात आले आहेत. गर्दीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल विशेष सतर्कता बाळगून आहे. प्रवाशांच्या सामानाची आणि दागिन्यांची सुरक्षा करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.






