
कोकण किनारपट्टीवर थर्टी फर्स्टचा जल्लोष
समुद्रकिनारे, रिसॉर्ट पर्यटकांनी गजबजले
पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल
गुहागर: थर्टी फर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुहागरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी गुहागर पोलीस, अन्न औषध प्रशासन, सागरी सुरक्षा रक्षक अलर्ट झाले आहेत. पर्यटकांच्या वाहने पार्किंगसाठी पोलिस परेड मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच गुहागर नगरपंचायत प्रशासनही यावर लक्ष ठेऊन आहे. २५ डिसेंबरपासून नाताळ सुरू झाला असून ३१ डिसेंबरला २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक ३१ डिसेंबरला रात्रभर जल्लोष करतात.
स्थानिक बचत गटांचे कोकणी खाद्य पदार्थांचे स्टॉल
या पाश्र्वभूमीवर या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात, यानिमित अन्न पदार्थाच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकाना निकृष्ट दजांचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.
Ratnagiri जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट’; प्रमुख मार्गावर असणार चेकपोस्ट
मनोरंजनासाठी पारंपरिक लोककलांचे कार्यक्रम
गुहागरमध्ये गेल्या आठवडाभर कोकणी खाद्य पदाथांचे स्टॉल स्थानिक बचत गटांनी उभारले आहेत. त्यामुळे बाहेरील पर्यटकांना गुहागरमध्ये आपल्या पसंतीचे कोकणी पद्धतीचे शकाहारी व मांसाहारी पदार्थ चाखायाना मिळणार आहेत. याबरोबरच मनोरंजनासाठी पारंपारिक कोकणी लोककलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. समुद्र किनारी फिरण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने स्वत्छता मोहीम राबविली आहे. सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. पर्यटकाना उंट सफर, घोडा गाडी, डॉल्फिन सफर करता येणार आहे.
Ratnagiri जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट
नववर्षांच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थाची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे. राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात येत आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.