कोकणातील 'होम स्टे' फुल्ल (फोटो- istockphoto)
देवस्थानांतर्फे पर्यटकांना निवासाची व्यवस्था
व्यवसायिक आतापासूनच लागले तयारीला
सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
दिनेश चव्हाण/ गुहागर: सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत असा पर्यटकांना द्विगुणित करणारा पर्यटन हंगाम सुरु झाला पर्यटकांना कोकणच्या सौंदर्याचे आतापासूनच वेध लागलेले दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे सर्व लॉज, निवासी स्थाने, पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने बुकींगने हाऊसफुल्ल झालेली आहेत. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण झालेले असून पर्यटकांकडून यावर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. इच्छीत पर्यटन ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडून दरवर्षी १ महिना अगोदरच निवासाचे बुकींग केले जाते.
व्यवसायिक आतापासूनच लागले तयारीला
तसेच हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे. कोकणात इतक्या प्रमाणात पर्यटक येतात की, ५ जानेवारीपर्यंत त्यांची पावले येथेच रेंगाळलेली पहायला मिळतात. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर, रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा, अलिबाग अशा भागातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीत उतरलेली आहेत.
ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद
स्वच्छतागृहांची दुरुस्ती, किनारी स्वच्छतेवर भर
ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून समुद्रकिनारे साफसफाईला सुरुवात झालेली आहे. वाहने पार्कीगसाठी मैदान, तळ आरक्षित करण्यात आलेले आहेत. स्वच्छतागृहांची दुरुस्ती, किनारी स्वच्छता दरवर्षी कोकणाकडे येणारा पर्यटक आपली राहण्याची व जेवणाची व्यवस्था अगोदरच बुकींग करुन ठेवतो. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.
देवस्थानांतर्फे पर्यटकांना निवासाची व्यवस्था
कोकणी मेव्याची दुकानेही गजबजलेली दिसून येत आहेत. यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. समुद्रकिनारी धोकादायक ठिकाणे दर्शविणारे फलक, वाहने पाकींग व्यवस्थेचे सूचना देणारे फलक लावण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येते. विशेष करून धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा अधिक ओढा असतो.
जेथे निसर्गसौंदर्याबरोबरच धार्मिक, पुरात स्थळे आहेत, अशा ठिकाणी पर्यटक अधिव येतात. त्यामुळे देवालयेही सज्ज झालेल आहेत. प्रसिध्द देवस्थानांकडूनही पर्यटकांन निवासाची व्यवस्था करण्यात येते. धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही पर्यटकांसाठी सुविध पुरविण्यात येतात.






