भु गावातील साकवाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
या पूलासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून देखिल प्रत्यक्षात रस्त्याची परिस्थिती सुधारली नसल्यामुळे या पूलाचा निधी वाया गेल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक करणे अवघड झाले आहे. गावातील आजारी रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जातानाही कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे गवातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पूलाचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने सुरुवातीच्या काळात एका महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाही. या मुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप देखिल ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर पूलाचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याबाबत ठेकेदार तसेच जिल्हा परिषद अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण मात्र, त्यानंतरही संबंधित काम पुढे सुरू ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पूलाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असतानाही पूलाचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे या संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या तब्बल ६० लाख रुपयांचा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला का ? सदर पूलाच्या कामाची गुणवत्ता आणि अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे का; तसेच पूलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम अपूर्ण का ठेवण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी राजापूर तालुक्यातील भु गावातील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच जिल्हा परिषद प्रशासनाची भूमिका काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित






