
चिपळूण : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूणनगर पालिकेच्या सध्या धोकादायक बनलेल्या इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असा ठाम शब्द राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
चिपळूण नगर पालिकेत विजयी झालेल्या शिवसेना–भाजप महायुतीचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ व सर्व नगरसेवकांच्या सत्कारासाठी अतिथी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, “चिपळूण नगर पालिकेच्या इमारतीसाठी निधी देण्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार हे सर्व आपल्या सोबत आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून निधीची कमतरता भासू देणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार समारंभाला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, विनोद झगडे, बापू आयरे, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, रुपेश घाग, स्वप्ना यादव, आरती सकपाळ यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूणवासीयांचे आभार मानले. “पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली,” असे ते म्हणाले. तसेच महायुतीच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. यावेळी प्रशांत यादव व माजी आमदार सदानंद चव्हाण यांची समायोजित भाषणे झाली.
Ans: चिपळूण नगरपालिकेची विद्यमान इमारत सध्या धोकादायक स्थितीत असून तिची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.
Ans: राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे सर्व या प्रकल्पासाठी पाठिंबा देत असल्याने निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.