Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 06:05 PM
Vasai Smart City Project

Vasai Smart City Project

Follow Us
Close
Follow Us:

वसई, जिप्र. वसई (Vasai) विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत. त्याचबरोबर अपघातही घडत असल्याचे नालासोपाऱ्यातील एका घटनेने समोर आले आहे. या घटनेत सायकलवरून जात असलेली २ छोटी मुले तब्बल १५ फूट खोल खड्डयात पडली. सुदैवाने दुखापतीवर त्या मुलांचा जीव वाचला, वसई विरार शहरात विविध ठिकाणी एसटीपी प्लांटसाठी मलवाहिनी जोडणाऱ्यांची कामे सुरु आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील दुबे कॉलेज यामुख्य रस्त्यावर दिवस-रात्र काम खोदकाम करून मलवाहिनी जोडण्याचे काम सुरू असून ५ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास २ लहान मुले सायकल घेऊन जात असताना कोणतीही बॅरिकेट्स न लावल्याने याठिकाणी असलेल्या १५ फूट खोल खड्चात पडली. सुदैवाने किरकोळ जखमेवरच निभावले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. परिवर्तन लढा सामाजिक संस्थेच्या कार्यालयासमोरच काम सुरु असून त्याचठिकाणी हो घटना घडल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशांत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली.

Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?

जुन्या इमारतींना धोका

इमारतींमधील सेफ्टी टैंक बंद करून इमारतीमधील मल मलवाहिनीतून थेट एसटीपी प्लांटमध्ये वाहून नेण्यासाठीचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्वाला मशिनरी दिवस-रात्र सुरु असून खोदकामामुळे जुन्या इमारतीला अक्षरशः हादरे बसत आहेत. हाद-यऱ्यांमुळे इमारतीमधील रहिवाशी देखिल भितीच्या छायेखाली असल्याचे म्हणणे आहे. याहादऱ्यामुळे इमारती धोकादायक स्थितीत जाण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

ठेकेदारावर जबाबदारी

प्लांटसाठी मलवाहिनी जोडण्याचे काम करताना रस्त्यात तब्बल पंधरा फूट खोल खड्डा करावा लागतो. मलवाहिनी जोडल्यानंतर खड्डा बुजवून रस्त्याची पुर्नबांधणी करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून निविदेतच तशी तरतूद आहे. महापालिका अधिकारी, अभियंता याकडे कानाडोळा करत असल्याने ठेकेदार प्रशासनावे साटेलोटे असल्याने मोठा गैख्यवहार सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का?

  • रस्त्याच्या मधोमध १५ फूट खोल खड्डा खोदून मलवाहिनी जोडण्याचे काम करताना सुरक्षितेतची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे बहुताश ठिकाणचे चित्र आहे.
  • १५ फूट खोल म्हणजे अत्यंत धोकादायक काम करताना तिथे लोखंडी पत्रे किंवा जड प्लास्टिकचे बेरिकेड्स एकमेकांना जोडून लावणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही चुकून आत पडणार नाहीं, परंतु येथे खड्डुचाभोवती फक्त ‘प्लास्टिकची टेप लावून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकारच महापालिकेने ठेकेदाराला दिल्याचे दिसत आहे, असा आरोप सुशात पवार यांनी केला आहे.
  • दरवर्षी गटारा उघडे असल्यामुळे पावस्यळ्यात गटारात पडून अनेक जीव जातात. त्याचप्रमाणे या खड्डचांमध्ये लोकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का?, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Deadly traps in the name of smart city administrative negligence leads to accident contractor ignored safety norms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • maharashta
  • Marathi News
  • vasai
  • virar

संबंधित बातम्या

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
1

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत
2

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
3

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Chandrapur News: चंद्रपूर-हावडा नवी रेल्वे मंजूर! बंगाली समुदायाच्या मागणीला अखेर यश
4

Chandrapur News: चंद्रपूर-हावडा नवी रेल्वे मंजूर! बंगाली समुदायाच्या मागणीला अखेर यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.