गडचिरोलीत मोठा अपघात; घराजवळच उलटला ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. या महामार्गावरील ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात शनिवारी सकाळी एक थरारक अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ज्यात चालक आणि त्याचा एक साथीदार जखमी झाले. चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती, मात्र स्थानिक तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
शनिवारी सकाळी ट्रक क्र एमएच ०१ इ डब्ल्यू ०६७५ भोस्ते घाटातून जात असताना हा अपघात झाल्याच समोर आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच ‘मदत ग्रुप खेड’चे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत विनायक कदम आणि अक्षय भोसले यांनीही मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.
ट्रक उलटल्याने चालक मोहम्मद शाकीर अब्दुल हमीद शेख (वय २३, रा. शांतीनगर, भिवंडी) हा केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. यावेळी मदतकार्य करणाऱ्यांनी एका अनोख्या युक्तीचा वापर केला. दुसऱ्या एका ट्रकच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकला दोरी बांधून त्याला हळूवारपणे सरळ करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात चालक मोहम्मद शाकीर आणि त्याच्यासोबत असलेला १४ वर्षीय अमन आरिफ शेख हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.