Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त

दोन्ही टप्प्यांतील निधीची एकत्रित रक्कम सुमारे २०.१८ कोटी रुपये इतकी झाली आहे. सध्या कोषागाराची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून ती पूर्ण होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही  जमा केली जाणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 05:17 PM
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त
Follow Us
Follow Us:

मच्छिमारांना डिझेल प्रतिपर्ती योजनेतन २०१८ कोटींचा निधी
रत्नागिरीतील मासेमारी नौकांना ‘आर्थिक इंधन’
नऊ वर्षत सातत्याने लाभ मिळाल्याचे स्पष्ट

गुहागर: समुद्रावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या मच्छीमारांसाठी डिझेल हा सर्वांत महत्त्वाचा आणि खर्चिक घटक मानला जातो. डिझेलच्या वाढत्या दरामुळे यांत्रिक नौकांचे संचालन दिवसेंदिवस महाग होत असताना राज्य शासनाच्या डिझेल प्रतिपूर्ती योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण २० कोटी १८ लाख ३९ हजार ९७५ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्यांनी यांत्रिक नौकांसाठी वापरलेल्या डिझेलवरील विक्रीकराची प्रतिपूर्ती केली जाते. शासनाकडून मंजूर होणारा निधी व्हीपीडीए प्रणालीद्वारे थेट पात्र मच्छिमारांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहून लाभाथ्यांना थेट आर्थिक मदत मिळते. यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील २६ मच्छिमार सहकारी संस्थांच्या ११६६ यांत्रिक नौकांसाठी ३१ हजार ८९५.३९ किलो लिटर इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात आला आहे.

Ratnagiri News: किनारी वाऱ्यांमुळे जाळे रिकामे; मासेमारी व्यवसाय संकटात अन्…

या कोट्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ कोटी ३० लाख ४४ हजार २८१ रुपयांचा निधी ६७५ नौकामालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये शासनाच्या आदेशानुसार १३ कोटी ८७ लाख ९५ हजार ६९४ रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त
झाला. या दोन्ही टप्प्यांतील निधीची एकत्रित रक्कम सुमारे २०.१८ कोटी रुपये इतकी झाली आहे. सध्या कोषागाराची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून ती पूर्ण होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही  जमा केली जाणार आहे.

मागील नऊ वर्षातील निधीकडे पाहिले असता या योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमाराना सातत्याने लाभ मिळाल्याचे स्पष्ट होते. या सर्व वर्षाचा एकत्रित विचार केला असता सुमारे २१ हजार २३७.८९ लाख रुपये. म्हणजेच अंदाजे २१२.३८ कोटी रुपयाचा निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे. यावरून या योजनेचा आर्थिक व्याप आणि त्यातून मिळणारा आधार स्पष्ट होतो.

Nitesh Rane: “अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ…”; अतिवृष्टीबाबत मंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

डिझेल दरवाढ, समुद्रातील बदलते हवामान आणि वाढते देखभाल खर्च या पाश्र्वभूमीवर डिडोल प्रतिपूर्ती योजना मच्छीमारांसाठी आर्थिक स्थैर्य देणारी ठरत आहे. या योजनेमुळे नौकांचे नियमित संचालन शक्य होत असून, मत्स्योत्पादन आणि संबंधित व्यवसाय साखळीला चालना मिळत असल्याची भावना मच्छिमार बांधवांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Fishermen in ratnagiri district received rs 20 crore under the compensation scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • fishermen
  • Fishermen community
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
1

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.