
'स्वच्छ भारत मिशन'चे कर्मचारी सहा महिने वेतनाविनाच; दैनंदिन खर्च भागवताना करावी लागतेय कसरत
चिपळूण : स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती तालुकास्तरावर गट संसाधन केंद्र असून, यामध्ये गट समन्वयक व समूह समन्वयक अशी पदे कंत्राटी तत्त्वावर आहेत. डिसेंबर २०२५ पासून या कक्षातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रवास खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवताना ताळमेळ जुळत नाही. सहा महिने वेतन नसल्याने मोठ्या गैरसोयीला त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्वच्छ भारत मिशन गट संसाधन केंद्रातील हे कर्मचारी स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये मार्गी लागण्यासाठी योगदान देत आहेत. मात्र, सहा महिने वेतन नसल्याने त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. चिपळूण येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गट संसाधन केंद्रातील आदिती शिंदे, ऋूतूजा राजेशिर्के, विनया लाड उपस्थित होत्या.
मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन धरणे आंदोलन
जिल्हा परिषदेसमोर एक जून ते पाच जून दरम्यान धरणे आंदोलन, आठ जून रोजी राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय जळगावपासून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी चालत जाऊन धरणे आंदोलन, नऊ जून पासून मानधन मिळेपर्यंत जिल्हास्तरावर काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीला वेग
माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीला वेग दिला आहे. घाट रस्त्यावरील खड्डे बुजवणे, संरक्षक कठडे दुरुस्त करणे आणि सुरक्षिततेच्या इतर उपायांवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. वाहतूक निर्बंध: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव माथेरान-नेरळ-कळंब घाट रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.