पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लाल मातीचे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.
Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा
माथेरानला पायी चालत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.माथेरान शहरातील रस्ते हे लाल मातीचे असल्याने पाऊस पडला की पावसाच्या पाण्याने रस्ते खराब होतात.माथेरान मध्ये पडणारा पाऊस यामुळे पावसाळ्यात तसेच सततच्या रहदारीमुळे अनेक ठिकाणी पॉईंट्स भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे खराब रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते पूर्ववत करण्यासाठी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी स्वतः आग्रही आहेत. हरमिटेज बंगला ते एको पॉईंट कडे जाणाऱ्या दगड मातीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पर्यटकांनाचालण्यासाठी तसेच अन्य वाहतुकीसाठी सोयीचे ठरणार आहे.
माथेरानला अनेक ठिकाणी आजही पॉईंट्स कडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मॅलेट स्प्रिंग, पेमास्टर गार्डन पासून पुढे भाऊसाहेब राऊत मार्ग,भेकर रोड, आर्टिस्ट पॉईंट रोड,हॉटेल वे साईड ते सेसिल हॉटेल रोड अशा अनेक भागातील रस्ते आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.या रस्त्यावर मोठं मोठे दगडगोटे असल्याने पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे बनलेले आहे. याकामी पावसाळ्यात ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केल्यास पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीला वेग दिला आहे. घाट रस्त्यावरील खड्डे बुजवणे, संरक्षक कठडे दुरुस्त करणे आणि सुरक्षिततेच्या इतर उपायांवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. वाहतूक निर्बंध: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव माथेरान-नेरळ-कळंब घाट रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे
Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा






