
रत्नागिरी शहरातील वाहतूककोंडी सुटणार
रविवारी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष या संपूर्ण मार्गावर चालत पायी पाहणी दौरा केला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. सफारशा कोणत्याही तांत्रिक अडचणी नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
घरमालकांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई कभी देता येईल याचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा महत्वाच्या सूवना मंत्री सामंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पोस्ट ऑफिस ते गोखले नाकা या भागातील रस्ता दोन्ही बाजूची ५ ते १० फूट जागा घेऊन अत्यंत सहजपणे रुंद करता येईल असे निदर्शनास आले, तसेच मारुती आळी ते तेली आळी नाका येथील नागरिकांनीही रस्ते रुंदीकरणासाठी अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवून प्रशासनाला सहकार्याची तयारी दाखवली आहे.
मारुती मंदिराच्या बाजूने ५ फूट आणि समोरील बाजूने १० फूट जागा रुंदीकरणासाठी घ्यावी, अशी व्यावहारिक भूमिका काही नागरिकांनी यावेळी स्वतःहून माडली. या सर्व बाबींचा विचार करून नेमकी कोणाची किश्ती जागा वाचित होऊ शकते है स्पष्ट करण्यासाठी सर्वप्रथम रस्त्यावर तातडीने मार्किंग करण्यात येणार आहे, मार्किंग पूर्ण झाल्यानंतर संबंधित बाधित होणाऱ्या ३१ जागा मालकांची एक प्राथमिक बैठक आयोजित केली जाईल, त्यानंतर माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमया उपस्थितीत अंतिम निर्णयासाठी पुढील महत्वाची बैठक पार पडणार आहे.
कोणत्याही जागा मालकावर वा व्यापाऱ्यावर अन्याय होऊ नये माणून प्रत्येकाला अतिरिक्त एफएसआय किंवा जागेचा योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशा प्रकारे योग्य तो मोबदला देऊन त्यांना कसा न्याय देता येईल, याचा प्राधान्याने विचार वारणाच्या स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Ans: रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
Ans: रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान कोणत्याही सामान्य नागरिकाचे किंवा स्थानिक व्यापाऱ्याचे नुकसान होऊ नये याबाबत सामंत यांनी सूचना दिली आहे.