Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार? ‘… मगच टोल घ्या’; Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?

महामार्गावर काम अपूर्ण असलेल्या अनेक ठिकाणी टोल प्लाझाची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ऑगस्ट महिन्यापासून या अपूर्ण महामार्गावर टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 02:59 PM
हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार? '... मगच टोल घ्या'; Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?

हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार? '... मगच टोल घ्या'; Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसूलीची तयारी 
  • महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा
  • पडलेल्या भेगांवर डांबराने मलमपट्टी
रत्नागिरी / गुहागर: तब्बल १७ते १८ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण नेमके कधी पूर्ण होणार, हा यक्षप्रश्न आता संपूणर्ण कोकणवासीयांसह लाखो प्रवाशांना पडला आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या महामार्गाच्या कामाची पोलखोल यंदाच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उघड्यावर आणली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून, कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यालाही अनेक ठिकाणी तडे पडल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावरील या भेगा लपवण्यासाठी त्यात डांबर भरले जात असल्याचेही दिसून येत आहे. नागरिकांना दररोज नाहक हालअपेष्ट आणि जीवाचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. काही टप्प्यांमध्ये काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गाची ही दुरवस्था कधी संपणार असा सवाल विचारला जात आहे.

थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा…

चाकरमान्यांच्या पदरी यंदाही पडणार निराशाच?

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता आता अधिकच वाढली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेशभक्त आपल्या मूळ गावी कोकणात दाखल होत असतात. मात्र अपूर्ण महामार्ग, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे यंदाही त्यांचा प्रवास कमालीचा त्रासदायक ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात सुरळीत प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी यंदाही निराशाच पडण्याची चिन्हे दिसत आहेत. तरीही यावर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने आगामी सणासुदीच्या काळात महामार्गावर प्रचंड दळणवळणाचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधी रस्ता पूर्ण करा, आणि मगच टोल घ्या…

एकीकडे महामार्गाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण असताना आणि रस्ता खड्कुचात गेलेला असतानाच दुसरीकडे मात्र टोल वसुलीची तयारी सुरू झाली आहे. महामार्गावर काम अपूर्ण असलेल्या अनेक ठिकाणी टोल प्लाझाची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ऑगस्ट महिन्यापासून या अपूर्ण महामार्गावर टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

रस्ता चालण्यायोग्य नसताना आणि सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असताना टोल आकारण्याच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये असंतोषाचा वणवा पेटला आहे. ‘आधी रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या’ अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. काम अपूर्ण असताना टोलवसुलीचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त प्रवाशांनी व स्थानिक संघटनांनी दिला आहे.

Web Title: Work mumbai goa highway remains incomplete there potholes many places yet plan to start toll collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Mumbai Goa Express Way
  • Road Work
  • Toll Plaza

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.