"रोजगार, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल....;" युवासेनेच्या सुशांत नाईकांचा नितेश राणेंवर घणाघात
कणकवली/ भगवान लोके: औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. अश्यातच आता शिवसेना ठाकरे गट आणि नितेश राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असल्याचं दिसून येत आहे. नितेश राणे हे हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आसा आरोप जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.
याबाबत सुशांत नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नाईक म्हणाले की, मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण होईल असे व्यक्तव्य करत आहे. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी व्यक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्टांना खुश करण्यासाठी अशी बेताल व्यक्तव्य करतात, पण नितेश राणे अशी भडखाऊ भाषणांमुळे राज्यातील युवक भडकले जात आहेत.
तरुणांची नितेश राणेंच्याभाषणांमुळे दिशाभूल होत आहे . मंत्री पदावर राहून असंवेदनशील वक्तव्य करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा , अशी मागणी युवासेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या रोजगाराचा, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल मंत्री राणे हे कधी बोलत नाहीत. पण रोज सकाळी उठून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी व्यक्तव कायम करत असतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगार, ठेकेदार यांची देणी बाकी आहेत , जे राज्यसरकार द्यायचे आहे, त्याबद्दल राणे कधीच बोलताना दिसून येत नाहीत.
पुण्यात आता पाणी बचत होणार अन् गळती थांबणार; महापालिकेने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील युवकांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता यावर नितेश राणे कधी भाष्य करताना दिसून येत नाहीत, यावरून नितेश राणे यांना शांत असलेले राज्य हे अशांततेच्या मार्गांवर घेऊन जायचे आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो, रोज उठून अशी भडखाऊ वक्तव्य करून दंगली घडवण्याच्या यांचा उद्देश असेल तर अश्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवासेनेच्यावतीने पोलीसांमार्फत करण्यात आली आहेत. यावेळी यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री, चेतन गुरव उपस्थित होते.