Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा , विकासकांना हमीपत्र देऊन करता येणार पुनर्विकास

नवी मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांना गती मिळणार आहे .खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री तसेच नगरसेवक विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2025 | 05:32 PM
नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा , विकासकांना हमीपत्र देऊन करता येणार पुनर्विकास (फोटो सौजन्य-X)

नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा , विकासकांना हमीपत्र देऊन करता येणार पुनर्विकास (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण विभागाच्या ना-हरकत दाखल्याच्या अटीअभावी पुनर्विकासाचे प्रस्ताव रखडले होते. मात्र आता पर्यावरण ना हरकत दाखल्याबाबत विकासकाकडून हमीपत्र घेऊन पालिका आयुक्त बांधकाम प्रस्तावास तत्वतः मंजुरी देऊ शकतात असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. या जाचक अटीतून दिलासा मिळाल्याने नवी मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांना गती मिळणार आहे . खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री तसेच नगरसेवक विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रहिवाश्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के,उपनेते विजय नाहटाआणि शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे आभार मानले आहेत.

‘पाच वर्ष खासदार असूनही मराठीचा ‘म’ बोलता येत नाही…’, शिवसेना महिला आघाडीकडून चतुर्वेदींना बालभारती पाठ्यपुस्तकाची भेट

नवी मुंबईतील सिडको निर्मित ३० वर्षे जुन्या असलेल्या तसेच धोकादायक स्थितीत असलेली अनेक रहिवाशी संकुले पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. ही अतिधोकादायक घरे राहण्यास योग्य नसूनही नागरिक जीव मुठीत धरून अनेक वर्षे त्याच ठिकाणी राहत आहेत. त्यांनी पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मात्र पर्यावरण दाखल्याअभावी सदर इमारतींच्या बांधकामांना पालिकेकडून परवानगी मिळत नव्हती. तर दुसरीकडे इमारती धोकादायक असल्याने जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने त्या रिकाम्या करण्यासाठी नोटीसच्या माध्यमांतून पालिका तगादा लावत होती. त्यामुळे रहिवाशांचे दोन्ही बाजूने मरण होत होते. मात्र जोपर्यंत आमच्या घरांच्या पुनर्विकासाला बांधकाम परवानगी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घरे रिकामी करणार नाही असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला होता. पालिका व रहिवाशांमध्ये हे वाद रंगल्याचे पाहायला मिळत होते. अखेर वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिका घेत होती. मात्र तरीही देखील रहिवाशी त्याच स्थितीत धोकादायक घरामध्ये राहत आहेत.

कल्याण डोंबिवलीच्या घटनेची पुनरावृत्ती

मागील वर्षी कल्याण डोंबिवली भागात धोकादायक इमारत कोसळून सात नागरिकांचा जीव गेला होता. अशी घटना नवी मुंबईत देखील घडू शकते ही बाब शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या निदर्शनास आणून दिली होती.याबाबत योग्य निणर्य घेण्याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खासदार नरेश म्हस्के यांनी पर्यावरण ना हरकत दाखल्याबाबतची किचकट बाब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित केली होती. त्यासाठी सातत्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता.

पालिका आयुक्तांना तत्वतः मंजुरी देण्याचा अधिकार

दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने देखील नवी मुंबई शहराला प्रदूषित शहर नसल्याचा निर्वाळा दिला होता. नगरविकास खात्याचे सह मुख्यसचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर नवी मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाकरिता सकारात्मक निर्णय मंजूर करण्यात आला. त्यानुसार नवीमुंबई पालिका क्षेत्रातील २० हजार चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र असलेल्या विकास प्रस्तावांना, प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याआधी पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला घेण्याच्या अटीबाबत, महापालिका आयुक्त स्तरावर प्रस्तावांची तत्त्वतः मंजुरी देण्यात यावी तसेच त्यासाठी विकासकांकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 Pune News: धक्कादायक! पुण्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेला मारहाण: नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

Web Title: Relief for redevelopment projects in navi mumbai redevelopment can be done by giving guarantees to developers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Mumbai
  • Navi Mumbai
  • nmmc

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
1

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
2

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.