Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड दक्षिणच्या बंधाऱ्यांना निधीचा दिलासा; डॉ. अतुल भोसलेंच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांचे तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

सन २०२५-२६ मध्ये १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राच्या लघु पाटबंधारे योजनांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. परिणामी, उंडाळे परिसरातील अनेक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली असून, टाळगाव, येणपे, मनवसह परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 08:49 AM
कराड दक्षिणच्या बंधाऱ्यांना निधीचा दिलासा

कराड दक्षिणच्या बंधाऱ्यांना निधीचा दिलासा

Follow Us
Follow Us:

कराड : कराड दक्षिण मतदारसंघातील लघु पाटबंधारे योजनांच्या रखडलेल्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिल्याने रखडलेल्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, धैर्यशील मोहिते-पाटील, नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, सन २०२५-२६ मध्ये १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राच्या लघु पाटबंधारे योजनांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. परिणामी, उंडाळे परिसरातील अनेक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली असून, टाळगाव, येणपे, मनवसह परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. या बंधाऱ्यांमुळे मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करून प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.

याचवेळी त्यांनी लघु पाटबंधारे तलावांवरील विद्युत मोटारी जोडण्याचा प्रश्नही उपस्थित केला. संबंधित आदेश अद्याप निघाले नसल्यामुळे नांदगाव, मनव, उंडाळे आणि घोगाव परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.

कराड दक्षिणमधील सिंचन सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने या बैठकीत आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लघु पाटबंधारे योजनांच्या कामांना लवकरच चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पूर कुठं आणि किती येणार हे आता आधीच समजणार; टेक्नॉलॉजीने केली कमाल

Web Title: Relief in funding for karad south barrages guardian minister orders immediate action following dr atul bhosales request

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Dam Water Level

संबंधित बातम्या

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश
1

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Amravati News: ‘धापेवाडा’तून २७०० क्युमेक्स विसर्ग! पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे उघडले; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
2

Amravati News: ‘धापेवाडा’तून २७०० क्युमेक्स विसर्ग! पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे उघडले; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
3

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.