
Washim Drinking Water Management
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कानेरकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरेद्र वाघमारे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक गावाचा स्वतंत्र आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम राहील, यासाठी आवश्यक नियोजन करावे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या पंचायत समितीनिहाय तातडीने आढावा बैठका घ्याव्यात. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या मुख्य व वितरण पाईपलाईनची दर १० दिवसांनी तपासणी करून गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांमधून रात्रीच्यावेळी बेकायदेशीरपणे पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने सजग रहावे, एकबुर्जी प्रकल्पातील अवैच सिंचन पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष लक्ष देऊन तेथील बेकायदेशीर वीज जोडण्या तत्काळ खंडित कराव्यात, असे निर्देशही महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आले. धरणे व तलावांवर अचानक रात्रपाळी पाहणी करण्यासाठी नगर परिषद, महावितरण, पाटबंधारे, लघु पाटबंधारे तसेच मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा समावेश असलेली संयुक्त गस्ती पथके स्थापन करून संबंधित विभागांनी आपल्या प्रतिनिधीची नावे व मोबाइल क्रमांक जिलाधिकारी कार्यालयास तत्काळ सादर करावेत.