
मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार, 27 ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत हि मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईतील रिक्षाचालक, टॅक्सिचालक युनियनने भेट घेतली असून त्यांनी मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अमराठी चालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय फडणवीसांनी ओव्हररुल केला असल्यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चा रंगल्या आहेत.
याआधी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल,’ असे म्हंटले होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरनाईकांचा निर्णय ओव्हररुल केला असल्याच्या चारचा रंगल्या असून अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराचा कालावधी मुदत म्हणून देण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आधी सांगितल्यानमुसार, अमराठी चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. या प्रक्रियेत संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबनाची कारवाई होऊ शकत होती; मात्र या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे सरनाईक म्हणाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतही मोठे विधान करत अमराठी रिक्षाचालक, टॅक्सी चालकांवर वर्षभरापर्यंत कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याची सरकारची भूमिका आहे. चालकांनी मराठी शिकावी आणि प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारात सहज संवाद साधता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे अमराठी चालकांना प्रशिक्षण घेण्यासाठी मोठी संधी मिळाली असून, आता पुढील वर्षभरात अधिकाधिक चालक मराठी भाषा शिकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही