Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्स ज्वेलर्सवर मोठा दरोडा; 14 कोटींचे सोन्याचे दागिने लंपास; पोलीस समजून दरोडेखोरांना दुकानात घेतलं अन्…

सांगलीमध्ये खळबळ उडवून (Sangli Crime) देणारी घटना घडली आहे. पोलीस असल्याचा बनाव करत सांगली शहरातल्या मिरज रस्त्यावर भरदिवसा रिलायन्स ज्वेलरी शॉपवर (Reliance Jwelery) दरोडा टाकण्यात आला आहे. सात ते आठ जणांच्या टोळीने हा दरोडा टाकत सुमारे 14 कोटी किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2023 | 03:16 PM
रिलायन्स ज्वेलर्सवर मोठा दरोडा; 14 कोटींचे सोन्याचे दागिने लंपास; पोलीस समजून दरोडेखोरांना दुकानात घेतलं अन्…
Follow Us
Follow Us:

सांगली : सांगलीमध्ये खळबळ उडवून (Sangli Crime) देणारी घटना घडली आहे. पोलीस असल्याचा बनाव करत सांगली शहरातल्या मिरज रस्त्यावर भरदिवसा रिलायन्स ज्वेलरी शॉपवर (Reliance Jwelery) दरोडा टाकण्यात आला आहे. सात ते आठ जणांच्या टोळीने हा दरोडा टाकत सुमारे 14 कोटी किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. तसेच दरोडेखोरांकडून या ठिकाणी असलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांना देखील मारहाण करण्यात आली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला आहे. या घटनेमुळे सांगली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सांगली-मिरज रोडवर असणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्सच्या दुकानावर रविवारी दरोडा पडला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सात ते आठ जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून रिलायन्स ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यानंतर दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत शॉपमध्ये असणाऱ्या कर्मचारी आणि ग्राहकांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना ओलिस ठेवले. तसेच विरोध करणाऱ्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर हे दरोडेखोर दुकानात असणारे सोन्याचे दागिने बॅगेत भरून पसार झाले. यावेळी एका ग्राहकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारात दुकानातील काच फुटली. या गोळीबारात ग्राहक वाचला पण फुटलेल्या काचेवर पडून जखमी झाला.

डिव्हीआर मशीन लंपास

पळून जाताना दरोडेखोरांनी दुकानात असणारे सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन देखील लंपास केली. यावेळी एक डिव्हीआर फुटल्याने तो तिथेच टाकून दरोडेखोरांनी पळ काढला. दोन गाड्यातून हे दरोडेखोर घटनास्थळी आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने धाव घेतली. भरदिवसा पडलेल्या या दरोड्याची बातमी पसरताच रिलायन्स ज्वेलर्स समोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी तातडीने पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी हे करण्यात आली आहेत.

14 कोटींचे दागिने

या दरोड्यात सुमारे 14 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लूटण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, भर दिवसा शहरातल्या मध्यवर्ती असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या धाडसी सिनेस्टाईल दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दरोड्यातील काही आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडा टाकल्यानतंर दरोडेखोरांनी मिरजेच्या दिशेने पळ काढल्याचे समोर आहे. तसेच हे दरोडेखोर परराज्यातील असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Robbery at reliance jewellers in sangli robbed of rs 14 crores gold nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 03:16 PM

Topics:  

  • Crime in Sangli
  • crime news
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.