
पाच-दहा मतांनीही फरक पडू शकतो, आता प्रत्येकाने...; खडसेंचा कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला
‘आधी ताकद दाखवा, पक्ष तिकीट द्यायला दारात येईल’
खडसे पुढे म्हणाल्या, “तुमचे काम चांगले असेल, तर पक्ष तिकीट द्यायला दारात येईल, पण आधी तुम्ही तुमची ताकद दाखवा. पक्ष तुमच्या पाठीशी आहे. पक्षाला तुमचे काम दिसत आहे, याची नोंद घ्या. मतदार यादीतील चुका आणि दुबार मतदानाचे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली ‘टीम’ तयार करावी, असेही आवाहन त्यांनी केले. “पाच-दहा मतांनीही निवडणुकीत फरक पडू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीला कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर सरचिटणीस जयंत शिंदे, प्रवक्ते माधव पाटील, प्रदेश संघटक संदीप चव्हाण, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष राहुल जाधव, ज्योती निंबाळकर, प्रियांका बारसे, सारिका हरगुडे, स्वाती पोकळे, कल्पना घाडगे, सुवर्णा वाळके, अर्चना हजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ‘कोअर कमिटी’ सज्ज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांची ‘कोअर कमिटी’ जाहीर केली आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या उपस्थितीत या समितीची बैठक झाली. पानसरे यांनी सांगितले, की “निवडणुकीला इच्छुक असलेल्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. त्याचबरोबर संघटनेबाहेरील इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.” यासाठी इच्छुकांना पक्षाशी संपर्क साधता यावा म्हणून विधानसभा मतदारसंघ आणि शहर पातळीवर प्रत्येकी दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी तुषार कामठे, देवेंद्र तायडे, काशिनाथ जगताप, इम्रान शेख, सुलक्षणा शीलवंत, संदीप चव्हाण, सुनील गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व इच्छुकांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पक्षाने केले आहे.