Rohit Pawar News: अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, “दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यायची वेळ आल्यास आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊ,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळताना दिसत आहेत, असा व्हिडिओ होता. या व्हिडिओसोबत रोहित पवार यांनी एक टोमणेखोर कॅप्शनही दिले होते.
सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं विधान
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले की, “जंगली रमी पे आओ ना महाराज… खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना देखील सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळ येत असावी.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या या व्हिडिओत कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं, “जंगली रमी पे आओ ना महाराज…” आणि “कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज!” अशा खोचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
IND vs ENG : Tamsin Beaumont च्या अॅक्शनवरून लॉर्ड्समध्ये गोंधळ, टीम इंडिया अपील करत राहिली,
रोहित पवार म्हणाले की, “रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, भावांतर यांसारख्या मागण्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येतील का? दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना, सभागृहात मंत्री रमी खेळत आहेत हे दुर्दैवी आहे.”
तसंच, “कधीतरी शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या…” असा स्पष्ट संदेशही रोहित पवारांनी दिला. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.