Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walmik Karad: बुडत्याचा पाय आणखी खोलात! कराडभोवतीचा फास आवळणार; ‘या’ प्रकरणात ED ची एन्ट्री होणार?

सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 28, 2025 | 09:58 PM
Walmik Karad: बुडत्याचा पाय आणखी खोलात! कराडभोवतीचा फास आवळणार; 'या' प्रकरणात ED ची एन्ट्री होणार?

Walmik Karad: बुडत्याचा पाय आणखी खोलात! कराडभोवतीचा फास आवळणार; 'या' प्रकरणात ED ची एन्ट्री होणार?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळच असल्याचे आरोप होत आहेत. मात्र आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात ईडीने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्त्याने या प्रकरणात ईडीने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत याबद्दलची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे सातत्याने नाव समोर येत असल्याने पोलिसांच्या तपासाला मर्यादा येत असल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे. बीड प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहेत. मात्र ईडीने देखील स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

हेही वाचा: Suresh Dhas: “करूणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल…”; सुरेश धसांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. वाल्मीक कराडविरोधात ईडीने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मंत्र्यांशी सबंधित कंपन्या आणि मालमत्ता समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला देखील प्रतिवादी करावे अशी मागणी केली गेली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे. सुनावणी झाल्यास हायकोर्ट काय निर्णय देते हे पहावे लागणार आहे.

तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा नवा प्रताप समोर

बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातच आता  वाल्मीक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा संवाद ऐकायला मिळतो. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Walmik Karad Viral Audio Clip: तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा नवा प्रताप समोर; ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल?

या संभाषणात कराडने “मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर काय चिंता” असे विधान केले आहे. या क्लिपमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात आहे. सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे यांच्याशी कराडचा संवाद असल्याचे क्लिपमध्ये ऐकायला मिळते. या संभाषणात, एका कार्यकर्त्याच्या प्रकरणावरून वाल्मिक कराडने हस्तक्षेप करत, “किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून” असे सांगितल्याचे आढळते.

Web Title: Rti person file petition in high court about ed enquiry to walmik karad beed santosh deshmukh case dhananjay munde latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 09:58 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Enforcement Directorate
  • High court
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
1

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
2

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान
3

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
4

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.