Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

जगभरात एआय म्हणजेच (Artificial Intelligence) खूप प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील समोर येताना दिसून येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2025 | 04:02 PM
Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात वाढला एआयचा वापर 
एआयमुळे अनेक लोकांना बसतोय फटका 
आशा भोसले यांची हायकोर्टात याचिका

जगभरात एआय म्हणजेच (Artificial Intelligence) खूप प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील समोर येताना दिसून येत आहेत. एआयचा अनेक जणांना फटका बसत आहे. याचा फटका सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देखील बसला आहे. आशा भोसले या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे.

आशा भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. एआय टेक्नॉलॉजीचा फटका बसला आहे. आशा भोसले यांनी एआय विरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. अमेरिकेतील काही एआय प्लॅटफॉर्म यांनी आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गायन शैली यांचा जसाच्या तसा वापर करत आपल्या रेकॉर्डिंगमध्ये बेकायदा उपयोग केल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी या दोन्ही एआय प्लॅटफॉर्मविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. वैयक्तिक हक्काच्या रक्षणासाठी आशा भोसले यांच्या वकिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.  दाखल करण्यात आलेल्या याचिकेची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आहे. आशा भोसले यांना अंतरिम दिलासा देण्याबाबत लवकरच आदेश दिले जातील असे हायकोर्टाने म्हटल्याचे समोर येत आहे.

Asha Bhosle: आयुष्यात पाहिले अनेक चढ-उतार; आता आशा भोसले यांच्या आवाजाने मिळवले वर्चस्व, जाणून घ्या संपूर्ण प्रवास!

आशा भोसलेंबद्दल जाणून घ्या

आशा भोसले नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. आशा त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि कुटुंबासह पुण्याहून मुंबईत आल्या. दोन्ही बहिणींनी चित्रपटांमध्ये गाणं गाण्यास सुरुवात केली. आशा भोसले यांनी त्यांचे पहिले गाणे ‘माझा बाळ’ (१९४३) या मराठी चित्रपटात गायले. त्यांनी ‘चुनरिया (१९४८)’ या बॉलीवूड चित्रपटात ‘सावन आया’ हे गाणे गायले. तेव्हापासून आशा भोसले संगीताच्या जगात सक्रिय आहेत.

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या कारकिर्दीत हळूहळू प्रगती होत होती. अचानक, वयाच्या १६ व्या वर्षी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केले. गणपत राव आशांपेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाला हे नाते स्वीकारले नाही. यामुळे आशा आणि लता मंगेशकर यांच्या नात्यात अंतर निर्माण झाले, जे बराच काळ टिकले. आशा भोसले यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल म्हटले होते की, ‘माझ्या पतीचे कुटुंब रूढीवादी होते, ते एका गायन स्टारला स्वीकारू शकत नव्हते. जेव्हा मी माझा धाकटा मुलगा आनंदला जन्म देणार होते, तेव्हा कुटुंबाने मला माझ्या पालकांच्या घरी परतण्यास सांगितले.’ आशा भोसले आणि गणपत राव यांचे लग्न टिकले नाही, ते ११ वर्षांनी वेगळे झाले. आशा भोसले यांना गणपत रावपासून तीन मुले झाली.

 

Web Title: Famous singer asha bhosale petition in highcourt against usa ai illgal use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Asha Bhosale
  • High court

संबंधित बातम्या

Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती
1

Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.