Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज

किल्ल्यात वेब सिरीज व चित्रपटाच्या शूटिंग विभागाने हूल्लडबाजी मांडली आहे. पुरातत्व वारसांचे नुकसान झाले आहे. यामुळे इतिहासप्रेमी लोकांनी नाराजी व्यक्त केली असून पुरात्व विभागाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 05:05 PM
Vasai Fort

Vasai Fort

Follow Us
Close
Follow Us:
  • वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी
  • पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज
  • पुरात्त्व विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ?
वसई (वा.) ऐतिहासिक वसई : किल्ल्यात वेब सिरीज व चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या युनिट्सने मागील काही काळात थैमान घातले आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिनियम पायदळी तुडवत येथील वास्तूंना नुकसान पोहोचवून सुरू असलेल्या चित्रीकरण विरोधात वसईतील पुरातत्व इतिहासप्रेमींनी शुक्रवारी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तक्रारी केल्या. पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांनी संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याची माहिती दिल्याचे सांगितले असले तरी शुक्रवारपर्यंत कोणतीही तक्रार वसई पोलीस ठाण्यात दिली गेली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. ज्या ऐतिहासिक वास्तूत मराठे आणि पोर्तुगीज यांच्या वसईचा अंतिम ऐतिहासिहक तह झाला तिथेच नंगानाच सुरु होता, अशी खंत इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केली आहे.

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

शिलालेखा वर चल लावून अन्नपदार्थ

वसईतील ऐतिहासिक किल्ल्यात फ्रान्सिस्कन चर्चमधे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. आवश्यक नियमावली न पाळून शिलालेखा वर चूल लावून अन्नपदार्थ शिजवत असल्याचे आढळून आले. याबरोबरच या ऐतिहासिक वास्तूत विविध ठिकाणी सेट्स उभारून या वास्तूला हानी पोचवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी काही महिला कलाकार अर्धनग्न अवस्थेत येथे धूम्रपान करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. यापूर्वी सदर ठिकाणी अशाच स्वरूपाची घटना घडली होती.

पुरातत्त्व विभागाकडून कारवाईस टाळाटाळ

कातारा टू या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी याच पुरातन वास्तुत मोठ्या प्रमाणात कचरा करण्यात आला. पुरातत्व विभागावरत्ती मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर विभागाला खडबडून जाग आली होती याबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांना विचारणा केली असता शुक्रवारच्या घडलेल्या घटने संदर्भात आपण पोलीस तक्रार देणार असून संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती दिली. वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यानी दिलेल्या माहितीत पुरातत्त्व विभागाकडून तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधितांविरोधात एफआयआर करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. विभागाने तक्रार दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्णा धाडीगावकर यांनी दिली.

या प्रकारांना बंदी घालण्याची दुर्गप्रेमींची मागणी

ऐतिहासिक वास्तू असलेल्या वसई किल्ल्यात शुक्रवारी चित्रीकरणाला परवानगी दिल्याने दुर्गप्रेमीनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारामुळे किल्ल्यातील वास्तूला हानी पोचत असून पावित्र्यही धोक्यात येत असल्याची चित्ता व्यक्त केली जात आहे. वसईचा ऐतिहासिक किल्ला यावास्तूची जतन आणि संवर्धन व्यवस्थित केले जात नसल्याने त्याला हानी पोचत आहे. तर किल्ल्यात होणारे प्रि वेडिंग शूटींगसह विविध चित्रीकरणांना परवानगी दिली जात असल्याने किल्ल्यात धिंगाणा सुरू असतो. किल्ल्याचे जतन करण्यासाठी अशा प्रकारांना बंदी घालण्याची मागणी दुर्गप्रेमींनी अनेकदा केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Kolhapur News : 21 जिल्ह्यांत तपासणी विशेष मोहीम ; सर्वांची सिकलसेल तपासणी व्हावी,आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

Web Title: Ruckus at vasai fort in the name of shooting damage to ancient structures sparks anger among history lovers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • maharashtra news
  • navarshtra news

संबंधित बातम्या

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
1

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
2

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक
3

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक

वसईमध्ये शिवसेना-भाजपा युती; जागा वाटप मात्र गुलदस्त्यात; अजित पवार गटाला बोलावणे नाही
4

वसईमध्ये शिवसेना-भाजपा युती; जागा वाटप मात्र गुलदस्त्यात; अजित पवार गटाला बोलावणे नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.