या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत,यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दि. 18 डिसेंबर ते दि. 15 जानेवारी 2026या कालावधीत ‘सिकलसेल’ अभियानाची पूर्व तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर दि. 15जानेवारी ते दि. 31 जानेवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, याबाबत आरोग्यमंत्री आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा1 ते 5 तारखेपर्यंत अदा झाले पाहिजेत, अशा सक्त सूचना दिल्या. पगार अदा करण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असेही त्यानी स्पष्ट केले. तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, अनावश्यक खर्च टाळावा व कार्यात पारदर्शकता ठेवावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
Ans: सिकलसेल आजाराचे लवकर निदान व उपचार सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी विशेष तपासणी मोहीम म्हणजे सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा.
Ans: सिकलसेल आजाराचे लवकर निदान करणे रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू न देणे
Ans: प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे एकही रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून काम करावे






