Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2026 | 06:21 PM
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर...

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर...

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास युवाशक्तीने आज जमिनीवर आणलेला आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी व शिक्षण पद्धतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अधिवेशनात त्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती पण अहंकारी मोदी सरकारने त्यावर चर्चा केली नाही, त्यानंतर छात्रों की गुंज हे अभियान सुरु केले, राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस, NSUI या संघटनांनी देशभर आवाज उठवला. तरुणाई रस्त्यावर उतरली, रस्त्यापासून संसदेपर्यंत शिक्षणातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यात आल. मागील दीड दोन महिन्यापासून देशातील तरुण मोदी सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात पेटून उठला होता. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या वल्गणा केल्या पण त्याची पूर्तता केली नाही, सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, स्पर्धा परिक्षातून काही यश मिळेल यासाठी विद्यार्थी चार चार वर्षे प्रयत्न करतात पण त्यातही घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे, हा मोठा प्रश्न आहे, असेही सावंत म्हणाले.

मोदी सरकारच्या काळात ५० टक्के तरुण बेरोजगार झाले आहेत. सरकारने आधीच ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. मागील १० वर्षात १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण सरकारने काहीच केले नाही. तरुणाई रस्त्यावर उतरली असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली, पॅलेट गनने हल्ला करण्यात आला. आज शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा झालेला आहे पण विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या, त्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचाही राजीनामा झाला पाहिजे, असेही सचिन सावंत म्हणाले. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर टिळक भवन येथे पेढे वाटण्यात आले व ढोल ताशे वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : ‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…

Web Title: Sachin sawant has reacted following dharmendra pradhans resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Congress
  • Dharmendra Pradhan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
1

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

BRICS 2026: भारत मंडपममध्ये ब्रिक्स परिषदेचा शंखनाद; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत दाखल, PM Modi सोबत महत्त्वपूर्ण बैठक
2

BRICS 2026: भारत मंडपममध्ये ब्रिक्स परिषदेचा शंखनाद; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत दाखल, PM Modi सोबत महत्त्वपूर्ण बैठक

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
3

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
4

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.