Saint Tukaram Maharaj world record-breaking big pagdi in dehu pune news
पुणे – लवकरच संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पार पडणार आहे. यासाठी देहूनगरी सजत आहे. याच संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या निमित्ताने विश्वविक्रमी पगडी तयार करण्यात आली आहे. तुकाराम महाराजांची ही पगडी जाज्वंल इतिहास आणि विश्ववंदनीय साहित्याचे प्रतिक आहे. या पगडीमुळे सर्वांना संत तुकाराम महाराजांकडून प्रेरणा आणि उर्जा मिळणार आहे. याचे लोकार्पण पार पडले असून या भव्य आकार पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पगडीची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये नोंद होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पगडीचा घेराव हा 22 फुटांचा असून पगडीची उंची 04 फूट आहे. ही विश्वविक्रमी पगडी तयार करण्यासाठी 450 मीटर लांबीचा कपडा लागला आहे. या पगडीची वारकरी सांप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पगडी सुती कापडापासून बनविण्यात आली: या भल्या मोठ्या पगडीचे अनावरण दिलीप सोनीगरा यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, हीविश्वविक्रमी पगडी सुती कापडापासून बनविण्यात आलेली आहे. या पगडीचा घेर 30 फुटांचा असून, याची उंची चार फुटांपर्यंत आहे. या पगडीला तयार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला असून, ही पगडी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. या अगोदर 28 फुटांच्या पगडीची विश्वविक्रमी नोंद झाली होती. परंतु यंदा 30 फूट घेर असलेली पगडी तयार करून हा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन पगडी बनवणारे शैलेश यादवांनी केलंय.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदर पगडी शैलेश यादव यांनी तयार केली तर पवन सोळंकी हे प्रेसिडेंट अन् सीईओवर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अॅन्ड जिनिअस बुक फाऊंडेशन यांनी सांगितले की, सदर पगडी शैलेश यादव यांनी तयार केली असून, दिलीप सोनीगरा यांच्या संकल्पनेतून ती आकाराला आली आहे. ही पगडी उंचीने पाच फूट असून, रुंदीने दहा फूट आहे आणि या पगडीचा घेर हा 30 फुटांचा आहे. त्यामुळे ही पगडी लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली असून, आज देहूगाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये पगडी ठेवण्यात आली आहे.