मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार; अंतरवलीतून संभाजीराजेंचा सरकारला इशारा
जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत प्रचंड खालावली असून त्यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती अंतरवली सराटी येथे दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत सरकारला एवढी यंत्रणा असून निर्णय घेतला नसल्याचं ते म्हणाले. हे सरकार आंदोलन गुंडाळायलाच बसलंय. मनोज जरांगेंना उद्या काही झालं तर सरकार जबाबदार असेल. मनोज जरांगेंचा जीव महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले.
संभाजीराजे नेमकं काय म्हणाले ?
राज्य सरकार निवांत मुंबईत AC ऑफिसात बसलं आहे. तसेच विरोधी पक्षातील नेते देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. मात्र आता हे चालणार नाही. तसेच हे तुमचं कॅबिनेट आहे ना… मग निर्णय घ्या ना. तसेच यासंदर्भात हो की नाही एकदाच बोलून टाका. तसेच जरांगे पाटलांची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना काही होऊ शकतं. मात्र त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र ही बाब राज्यातील इतिहासातील वाईट आहे. जर एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी देखील लावायला बसले आहेत. मात्र त्याची दखल तर नाहीच पण त्यासंदर्भात निर्णय देखील सरकारने घेतलेला नाही. याशिवाय आता मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज अंतरवली सराटी येथे आलो आहे. असंही संभाजेराजे यावेळी म्हणाले.
पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो आहे. पण मला दु:खी वाटतं आहे. वेदना देखील होत आहे. तसेच त्यांनी आता तर सलाईन घ्यायचं देखील बंद केलं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं चूकीचं असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. जरांगेंना काही झालं तर सरकार आणि विरोधक जबाबदार असतील असा इशारा आंतरवली सराटीतून संभाजीराजेंनी दिला. आज मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीत एकदाचा निर्णय घेऊन टाका असं त्यांनी सरकारला सांगितलंय.