
Sambhajinagar News: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर १४ ठिकाणी महायुती तुटली छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी रोखण्यात आली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली, तर पोलिस संरक्षणात कराड आणि सावे यांनी तेथून माघार घेतली.
सलग दुसऱ्या दिवशीही शहरात भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळाला. इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी कराड आणि सावे यांच्या वाहनांना घेराव घालत गंभीर आरोप केले. यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचे फोटो फाडले असून, सावेंच्या पीएला व नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. Outburst of workers over candidacy in BJP
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. मंत्री अतूल सावेंना काय भेटलं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पीए ला उमेदवारी दिली. त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे आणल. त्यांनी संभाजीनगरमध्ये केलेला सर्वे समोर आणावा,माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेल. भागवत कराडांनी फक्त वंजारी समाजातील उमेदवारांना तिकीटे दिली.असा संताप व्यक्त करत नाराजांनी अतुल सावे आणि भागवत कराडांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एकेरी शब्दांत कार्यकर्त्यांनी शिवीगाळही केल्याचे दिसून आले.
याशिवाय कार्यकर्त्यांनी भागवत कराडांच्या गाडीला घेराव घालत त्यांची गाडीही अडवली, गाडीला काळं फासलं. महिला कार्यकर्त्यांही चांगल्याच संतापल्याचे पाहयला मिळाले, भाजपने कार्यकर्त्यांवर अन्याय केला. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही, असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या सगळ्या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिस दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले. पण तरीही कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक कमी झाला नाही. ‘ हे नेते आमच्या घरी येत होते. त्यांच्यासाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले, तुम्हाला उमेदवारी देऊ, असं आश्वासन देत त्यांनी लॉलीपॉप दाखवलं. पण शेवटच्या दिवशी आम्हाला तिकीट दिलं नाही. पण आता आम्ही यांचे सर्व उमेदवार पाडणार, असा इशाराही त्यांनी दिला.
भदाने पाटील नावाच्या कार्यकर्त्यानेही संताप व्यक्त केला. ” मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. पक्षासाठी रात्रंदिवस झटलो. पण साहेबांनी मात्र त्यांच्या पीए ला तिकीट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले. आता मला काही झालं तर त्याला नेतृत्त्व जाबाबदार असेल.” असा इशाहारी भदाने पाटील यांनी दिला. भागवत कराड यांनी जातीच्या आधारावर आणि अतूल सावेंनी त्यांच्या पीए ला तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर उमेदवारी न मिळाल्याने सुवर्ण मराठे यांनी कडाक्याच्या थंडीतही भाजप कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
भाजप अन्याय न करणारा पक्ष असल्यामुळे आम्ही गेल्या २० वर्षांपासून काम करत आहोत. पण भाजपने आमच्यावर अन्याय केला आमच्या घराघरात पोहचलेला माणूस असतानाही त्याला तिकीट नाकारलं. पण ज्याला कोणी ओळखतही नाही, एक काम केलं नाही, त्याला यांनी तिकीट दिलं. जो माणूस आमच्या कामाचा आहे, त्याचंच खच्चीकरण केल. २० वर्षांपासूनल त्याला लुबाडलं. अशी टिकाही एका महिला कार्यकर्त्याने केली.
Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी
गेल्या २५ वर्षांपासून मी भाजपचं काम करत आहे. तुला तिकीट देतो अस त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी सावेंच्य पीए ला तिकीट दिलं. भागवत कराड यांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं. त्याल सर्वेत २ टक्केपण नाहीत पण तरीही त्याला तिकीट दिलं.मी रात्रंदिवस पक्षासाठी झटूनही मला तिकीट मिळलं नाही. मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं. पण एकाने जातीचा दिला आणि दुसऱ्याने पीए ला तिकीट दिलं. जर हा जनतेचा पक्ष आहे, पण तरीही त्यांनी जनताच सोडली. आता ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली आहे. मला त्यांनी अंधारात ठेवलं, मी इतका अन्याय सहन करू शकत नाही. हा सर्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवा. सर्वेमध्ये मी पुढे असून मला अंधारात ठेवलं. त्यांनी पीएला उमेदवारी दिली. हे सगळं करून सावेंना काय भेटलं असा सवाही त्यांनी उपस्थित केला.