
Sangli News, Sangli DCC Bank, Jayant Patil, Vishal Patil,
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी आज दिवसभर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, ऋतुराज देशमुख, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, विश्वजीत कदम, सम्राट महाडिक, इंद्रिस नायकवडी, महेंद्र लाड आणि अमोल बाबर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेतून जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, काँग्रेसला सहा, अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला तीन जागा देण्याचे सूत्र ठरले. या तडजोडीतून १९ जागांवरील निवडणुकीचा पेच सुटला असून, जत आणि कवठेमहांकाळ या दोन सोसायटी गटांत थेट लढती होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागावाटपाच्या तडजोडीने १९ जागांवरील संघर्ष टळल्याचे चित्र असले, तरी जत आणि कवठेमहांकाळमधील लढतींमुळे निवडणुकीतील राजकीय उत्सुकता कायम आहे.
जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता होती. मात्र, प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या चर्चेत विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या चर्चेमुळे अनेक जागांवरील संभाव्य संघर्ष टाळण्यात यश आल्याचे चित्र आहे.
पक्ष जागा
भाजप ४
राष्ट्रवादी काँग्रेस- ७
काँग्रेस ६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १
शिवसेना (शिंदे गट) ३
एकूण २१
१. अमोल बाबर
२. विश्वजीत कदम
३. महेंद्र लाड
४. देवराज पाटील
५. विराज नाईक
६. तानाजी पाटील
७. अण्णासाहेब कोरे
८. सुमनताई पाटील
९. राहुल महाडिक
१०. पृथ्वीराज पाटील
११. सतीश देशमुख
१२. रणधीर नाईक
१३. के. डी. कांबळे
१४. वैभव विलासराव शिंदे
१५. पूजा विशाल पाटील
१६. वर्षा विक्रम सावंत
१७. रेणुका सत्यजित देशमुख
१८. संभाजी कचरे
१९. नितीन होणराव
Maharashtra School Diwali Holidays 2026: शाळांच्या दिवाळी सुट्ट्या जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत शाळा
कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि टी. व्ही. पाटील यांच्यात लढत होणार आहे. जागावाटपाच्या तडजोडीतून बहुतांश जागांवरील निवडणूक टळली असली, तरी या गटातील लढतीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस कायम राहणार आहे.
जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात सामना होणार आहे. या लढतीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर या दोन गटांतील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.
Ans: एकूण २१ जागांपैकी १९ जागांवर सर्वपक्षीय तडजोड झाल्याने १९ जागा बिनविरोध होत आहेत.
Ans: जत सोसायटी गट आणि कवठेमहांकाळ सोसायटी गट या दोन मतदारसंघांमध्ये स्थानिक राजकीय लढत होणार आहे.