Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्ह्यात 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 11:12 AM
सांगली जिल्ह्यात 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सरासरी 69.76 टक्के मतदान; प्रशासन सज्ज

सांगली जिल्ह्यात 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सरासरी 69.76 टक्के मतदान; प्रशासन सज्ज

Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितींच्या 122 निर्वाचन गणांसाठी शनिवारी (दि.7) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. आता या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली. सध्या भाजप आघाडीवर दिसत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात आटपाडी – 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या होणार आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

सांगलीत अनेक ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यात आटपाडी-तहसीलदार कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला हॉल, जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत समोर, खानापूर – इंडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, बळवंत कॉलेज, विटा, कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कराड–कडेगाव रोड, तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात पार पडले शांततेत मतदान 

“शनिवारी जिल्ह्यात निर्भिड व पारदर्शक मतदान पार पडले. आज मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”

– अशोक काकडे, जिल्हाधिकारी.

नावांबाबत होता किरकोळ गोंधळ

काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी राखीव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

हेदेखील वाचा : Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Web Title: Sangli district vote counting will be conducted on 191 tables in 122 rounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Sangli District

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
2

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
3

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.