
सांगलीत बेदाण्याची तस्करी
पदाधिकाऱ्यांनी टाकल्या धाडी
निकृष्ट दर्जाचा अफगाणी बेदाणा छुप्या मार्गाने आयात करून कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली, याची खात्री करण्यासाठी बागायतदार संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर अचानक धाडी टाकल्या, त्यावेळी त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचा अफगाणी बेदाणा प्रक्रिया करत असल्याचे समोर आले.
Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत
अफगाणी बेदाण्यामुळे १०० रुपयांनी दर पडले
त्या ठिकाणी अफगाणी आवरण काढून सांगलीच्या बेदाण्याचे बॉक्स दाखवून ते कोल्ड स्टोरेजला ठेवण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून हाच बेदाणा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे परिणामी गेल्या आठवड्यात बेदाण्याचा द्राक्षाचा तुटवडा असून देखील सुमारे १०० रुपयाने दर घसरले आहेत.
रेसिड्यू-फ्री नसल्याने जीवाशी खेळ
अफगाणी बेदाणा निकृष्ट दर्जाचा असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी सांगितले, हा बेदाणा (रेसिड्यू फ्री) ‘अवशेषमुक्त तपासणी करण्यात आलेला नाही, तसेच छुप्या मार्गाने आलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना यापासून जीविकास धोका निर्माण होऊ शकतो, याची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीच्या बेदाण्याची बदनामी होण्याचा धोका
एकीकडे आधीच द्राक्ष शेती संकटात आलेले आहे त्यात सांगली जिल्ह्याचे द्राक्ष आणि बेदाणा या क्षेत्रात देशभर चांगले नाव आहे; मात्र व्यापाऱ्यांकडून नफाखोरी साठी अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगलीचा म्हणून जर विक्री करण्यात आली, तर देशभर सांगलीचा माल खराब असल्याची बदनामी होण्याचा धोका आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन, संबंधितांचे परवाने रद्द करावेत, त्यांच्या गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी – दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या