एकूण ११ लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आता असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातून समोर आला आहे. ३७ ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी २२ वर्षीय जैब जावेद शेख याला अटक केली असून पोलिसांनी आरोपीकडून ३४ डेबिट कार्ड, 27 मोबाईल सिम कार्ड, सहा मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहन, असा एकूण ११ लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना बँकः खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि हा प्रकार उघडकीस आणला.
संशयास्पद व्यवहारावरून आरोपी अटकेत
अटक करण्यात आलेला आरोपी जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचे सायबर पोलिसांना निष्पन्न झाले. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून तर नागरिकांनी अशा फसव्या व्यवहाराला बळी न पडता योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Ans: नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम वर्ग केली जात होती.
Ans: जैब जावेद शेख (वय 22) या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: 34 डेबिट कार्ड, 27 सिम कार्ड, 6 मोबाईल फोन व 11.05 लाखांचा मुद्देमाल.






