Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले; अफवांना पूर्णविराम, रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदी संगीता पाटील यांची निवड. आमदार रोहित पाटील गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने भाजपचे 'ऑपरेशन लोटस' अयशस्वी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 07:19 PM
सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले (Photo Credit - X)

सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले
  • अफवांना पूर्णविराम
  • रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत
सांगली : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी दिवसभर राजकीय नाट्य रंगले असून आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या गटाच्या अनुपस्थितीबाबत पसरलेल्या अफवांमुळे निवडणुकीचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी रोहित पाटील गटाचे सर्व सदस्य सभागृहात उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करताच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

निवडणुकीपूर्वी भाजपकडून सत्तास्थापनेचे जोरदार दावे करण्यात येत होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आमदार रोहित पाटील, सुहास बाबर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. या चर्चेनंतर शिवसेनेच्या शीतल बाबर यांना अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरणार आणि त्यासाठी रोहित पाटील गटाचे काही सदस्य गैरहजर राहतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती.

मात्र प्रत्यक्षात दुपारी मतदानाच्या वेळी रोहित पाटील गट एकसंघपणे सभागृहात उपस्थित राहिला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार का, याबाबत निर्माण झालेली उत्कंठा अखेर फोल ठरली.

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

दरम्यान, सभागृहात भाजपचे सर्वच नेते उपस्थित असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले होते. तर शितल बाबर यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला होता,सत्तांतराची शक्यता गृहित धरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र शीतल बाबर यांनी अर्ज मागे घेतला व अखेरच्या क्षणी समीकरणे बदलली नाहीत आणि महाविकास आघाडीने सत्ता राखण्यात यश मिळवले.

या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पुतणी आहेत. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांना संधी देण्यात आली. एकूणच, रोहित पाटील गटाबाबत पसरलेल्या अफवा निराधार ठरल्या असून महाविकास आघाडीची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मैत्रीमुळे अफवांना खतपाणी

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सुहास बाबर आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील निकटच्या मैत्रीची जोरदार चर्चा रंगली होती. या संबंधांमुळे रोहित पाटील हे शिवसेनेच्या शितल बाबर यांच्या अध्यक्षपदासाठी अनुकूल भूमिका घेतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता; मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रोहित पाटील यांनी अखेरपर्यंत पक्षनिष्ठा जपून महाविकास आघाडीच्या बाजूनेच भूमिका कायम ठेवली. तरीही बाबर-पाटील मैत्रीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या चर्चांना मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि त्यातूनच अफवांना अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

Web Title: Sangli operation lotus fails rohit patil mva support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Rohit Patil
  • Sangli
  • Sangli Politics
  • Suhas Babar

संबंधित बातम्या

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण
1

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
2

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ
3

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
4

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.