Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर

Sangli Teacher Bank 74th Annual Meeting: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी होणार असून, यंदा सभासदांना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक ५ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 24, 2026 | 08:48 PM
Sangli Teacher Bank 74th Annual Meeting

Sangli Teacher Bank 74th Annual Meeting

Follow Us
Follow Us:
  • सभासदांसाठी गुड न्यूज
  • शिक्षक बँकेचा ५ टक्के लाभांशाचा निर्णय
  • कर्जमर्यादा १६ वरून २० लाख
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक ५ टक्के लाभांश यंदा सभासदांना देण्यात येणार असून, बँकेच्या ठेवींनी ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कर्जमर्यादेत वाढ, शिक्षण सेवकांना कर्ज, आकस्मिक कर्जमर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविणे आणि ‘मृतसंजीवनी’ योजनेतील मदतीत वाढ असे अनेक सभासदहिताचे निर्णय घेतल्याची माहिती चेअरमन अशोक घागरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही दीर्घकाळापासून कार्यरत सहकारी बँक असून तिचे प्रधान कार्यालय सांगलीत आहे. १३ डिसेंबर २०२५ रोजी स्वाभिमानी मंडळाने बँकेचा कारभार हाती घेतला. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ पाच महिन्यांचा कालावधी मिळाला. तरी काटकसरीचे धोरण स्वीकारून सभासदांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतल्याचे घागरे यांनी सांगितले.

‘काटकसरीतून सभासदांना ५ टक्के लाभांश’

घागरे म्हणाले, “मागील कारभाऱ्यांनी २.६६ टक्क्यांच्या आसपास लाभांश दिला होता. आमच्याकडे केवळ पाच महिन्यांचा कालावधी असतानाही काटकसरीने कारभार करून ५ टक्के लाभांश देत आहोत. यापूर्वी २०२० मध्ये शून्य टक्के लाभांश देण्याचीही वेळ आली होती. सभासदांच्या पैशाचा योग्य वापर करून त्यांना जास्तीत जास्त फायदा देणे ही आमची भूमिका आहे.” यापूर्वी बांधकामासाठी करण्यात आलेले काही ठेके चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा करत ते रद्द करण्यात आल्याचेही घागरे यांनी सांगितले.

कर्जमर्यादा १६ वरून २० लाख

बँकेने नियमित कर्जाची मर्यादा १६ लाखांवरून २० लाख रुपये केली असून त्यासाठी ९.७५ टक्के व्याजदर असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण सेवकांना कायम सभासदत्व देऊन त्यांच्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आकस्मिक कर्जाची मर्यादाही तीन लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली.

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सभासदांसाठी असलेला दुजाभाव दूर करून दोन्हीकडील सभासदांना समान ५५ लाख रुपयांची एकूण कर्जमर्यादा लागू करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठेवी ६०० कोटींपार; मासिक कपातीत ३०० रुपयांचा दिलासा

उपाध्यक्ष कृष्णा पोळ म्हणाले, “बँकेवरील ठेवीदारांचा विश्वास वाढला असून ठेवींनी ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सभासदांची मासिक कपात १३०० रुपयांवरून एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाची दरमहा ३०० रुपयांची कपात कमी होणार आहे.” सर्व सभासदांनी वार्षिक सभेला उपस्थित राहावे; मात्र सभा शांततेत आणि शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा कायम राखून पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोळ यांनी केले.

‘मृतसंजीवनी’त आता १२ ते १५ लाखांची मदत

जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले, “‘मृतसंजीवनी’ योजनेच्या मासिक कपातीत वाढ न करता मृत सभासदांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीत वाढ केली आहे. जुन्या पेन्शन योजनेतील सभासदांच्या वारसांना मिळणारी मदत ७ लाखांवरून १२ लाख रुपये, तर एनपीएसधारक सभासदांच्या कुटुंबीयांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.”

एमपीएससीधारक शिक्षकांसाठी अतिरिक्त मदतीची तरतूद करण्यात आली असून विविध स्वरूपात आतापर्यंत सुमारे २ कोटी ५७ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कर्ज असलेल्या तसेच कर्ज नसलेल्या मृत सभासदांच्या कुटुंबीयांनाही योजनेतून मदत दिल्याचे त्यांनी सांगितले. परजिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या सभासदांकडून यापूर्वी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात होती. आता सर्व सभासदांसाठी कागदपत्रांबाबत समान निकष ठेवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

संगणक-दुरुस्ती खर्चात ७२ लाखांची बचत

बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये संगणक घसारा व दुरुस्तीवर सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला होता. चालू वर्षात हा खर्च सुमारे ५८ लाख रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे सुमारे ७२ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा करण्यात आला. आवश्यक डिजिटल बँकिंग व सायबर सुरक्षेवरील खर्च मात्र करण्यात आल्याचे सांगण्यात आले.वसुलीवर विशेष भर दिल्याने थकीत कर्जाची वसुली सुधारली असून एनपीएसाठीची तरतूद शून्यावर आणण्यात यश आल्याचा दावाही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

‘प्रश्न विचारा; प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ’

स्वाभिमानी मंडळाचे नेते अविनाश गुरव यांनी आगामी सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना उद्देशून सांगितले, “सभासदांनी विधायक मार्गाने प्रश्न विचारावेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र सभेत अनुचित प्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही आणि आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.”

वार्षिक सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासह सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील सत्ताधाऱ्यांनी जुन्या शाखांच्या दुरुस्तीवर दोन वर्षांत सुमारे एक कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करत त्या खर्चाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

‘पुढील वर्षी आणखी चांगला लाभांश देण्याचा प्रयत्न’

पाच महिन्यांच्या कारभारात ५ टक्के लाभांश देणे शक्य झाले असून आगामी आर्थिक वर्षात पूर्ण वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने सभासदांना अधिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेस चेअरमन अशोक घागरे, व्हाईस चेअरमन कृष्णा पोळ, स्वाभिमानीचे नेते जगन्नाथ कोळपे, अविनाश गुरव, सुधाकर पाटील, तानाजी खोत, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मुश्ताक पटेल, माजी चेअरमन रुपाली गुरव, संजय महिंद, अनिता काटे, फत्तू नदाफ, मिलन नागणे, नितीन चव्हाण, अमोल शिंदे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल माने, सचिन खरमाटे, धनाजी घाडगे, राहुल पाटणे, शिवाजी जाधव, सुनील तावरे, उल्हास सानप, विलास हाके, विश्वास पुजारी, मागासवर्गीय संघटनेचे संतोष काटे, खाजगी शिक्षक परिषदेचे बाळासाहेब कटारे, नितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Washim: लाखोंचा ऐवज लंपास, एलसीबीच्या कारवाईत अट्टल घरफोड्या जेरबंद; घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Web Title: Sangli primary teacher bank annual meeting 5 percent dividend increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Sangli
  • Sangli District Bank
  • Teachers Bank

संबंधित बातम्या

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
1

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
2

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
3

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
4

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.