Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्

Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या विवाहितेचा रक्तरंजित अंत! प्रेमसंबंधाला नकार दिल्याने नराधमाने घरात घुसून केला धारदार शस्त्राने वार... सांगलीतील या थरारक घटनेने उडाली खळबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 11:36 AM
Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्

Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून ३० वर्षीय विवाहित महिलेची हत्या
  • नकाराच्या रागातून आरोपी मनोज कोळेकरने घरात घुसून महिलेवर धारदार शस्त्राने वार
  • काही तासांत मुख्य आरोपी मनोज कोळेकर आणि त्याच्या एका साथीदाराला अटक
Murder Case: जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एका नराधम प्रियकराने आपल्या ३० वर्षीय विवाहित प्रेयसीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला आहे. जत तालुक्यातील कंठी गावात ही थरारक घटना घडली आहे. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, जत पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य संशयित प्रियकर मनोज कोळेकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

हेही वाचा: Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत राजाक्का खरात या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या आपल्या मूळगावी कंठी येथे आल्या होत्या. राजाक्का यांचे गावातीलच मनोज कोळेकर या तरुणासोबत मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या राजाक्का यांनी या नात्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.

रविवारी सायंकाळी संशयित मनोज कोळेकर याने राजाक्का यांना भेटण्यासाठी आणि पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. मात्र, राजाक्का यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. हा नकार मनोजच्या जिव्हारी लागला आणि संतापाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

घरात घुसून केला वार!

नकाराच्या रागाने अंध झालेल्या मनोज कोळेकर याने थेट राजाक्का यांचे घर गाठले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्यानंतर, मनोजने जवळील धारदार शस्त्राने राजाक्का यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात राजाक्का रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

जत पोलिसांची धडक कारवाई

घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी मनोज कोळेकर याला त्याच्या एका साथीदारासह बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास जत पोलीस करत आहेत.

Web Title: Sangli jat kanthi village woman murder love affair sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • crime news marathi
  • love affairs
  • Love Crime
  • marraige
  • murder case news
  • Sangli

संबंधित बातम्या

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
1

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

PSI Suicide: पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या
2

PSI Suicide: पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी
3

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.