मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले संग्राम थोपट यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील त्यांना काँग्रेस न सोडण्याचे आवाहन केले होते. पण अखेर आज (22 एप्रिल) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संग्राम थोपटे यांची काँग्रेसचे निष्ठावंत नेत्यांमध्ये ओळख होती. पण भाजप प्रवेशाच्या वेळी काँग्रेसनेच आपल्यावर ही वेळ आणली, अशी टीका त्यांनी केली.
पक्षप्रवेशावेळी बोलताना थोपटे म्हणाले की, काँग्रेस सोडण्याची वेळी माझ्यावर काँग्रेसनेच आणली. गेल्या पाच-सात वर्षांपासून मी या गोष्टीचा विचार करत आहे. विधीमंडळात विखे-पाटील मला वारंवार म्हणायचे की, अरे काहीतरी विचार कर, असा किती दिवस तुझ्यावर अन्याय होणार काहीतरी निर्णय घे, जयकुमार गोरे, राहुल दादा, यांच्यासह भाजपमधील अनेक प्रतिष्ठीत सहकारी मला निर्णय घ्यायला सांगायचे. पण मी त्यांना म्हणायचो, मी निर्णय घेऊ शकत नाही. मी एका विचाराने बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळे मी या विचारापर्यंत पोहचत नव्हतो.
Waqf Act : वक्फ कायद्याविरोधात आंदोलन पेटणार; देशातील सर्व मुस्लिम संघटना सहभागी होणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत, आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला. आपण सर्वांनी काटेकोरपणे काम केलं. पण केलेलं काम आणि निष्ठा राखून मी काम केलं. त्या निष्ठेचं कोणतही फळ माझ्या पदरात पडलं नाही. संघर्षासाठी आम्ही डगमगलो नाही. जिल्हा परिषद, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पक्षाकडून ताकद मिळो न मिळो, तरीही तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं काम केलं. पूर्वीचे दिवस आठवल्यावर आजचा दिवस पाहताना खरंतर वाईट वाटत आहे. आम्ही तळागाळापर्यंत पक्ष वाढवला. पण नाईलाजाने आज या निर्णयाप्रत येऊन पोहचलो.
कार्यकर्त्यांची खंत होती, निराशा होती. निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता बोलायचा, दादा आता काहीतरी निर्णय़ घेतला पाहिजे. आपल्याला बदल केला पाहिजे विकासाची कास धरून निर्णय घेतला पाहिजे. माझ्याही डोक्यावरून पाणी चाललं होतं. मी त्यांना प्रत पोहचलो. यादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्त्वातील महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.
आम्ही स्वाभिमाने काँग्रेसमध्ये राहिलो. अनेकदा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. आज अशी परिस्थिती आहे. संग्राम थोपटेला काही मिळावं, या उद्देशाने मी इथे आलो नाही. माझ्या तालुक्यात, जिल्ह्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे.