Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam: ‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही; संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार

Sanjay Nirupam: शिवसेना नेते संजय निरुपम यांनी 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली आहे. तसेच तमिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेवरून त्यांना 'सत्तालोभी' म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 07:20 PM
संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार (Photo Credit- X)

संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही
  • संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार
मुंबई: एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला भारतीय म्हणवून घेण्याचा आणि या देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा कडक शब्दांत निरुपम यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला.

‘वंदे मातरम’ हा स्वातंत्र्यलढ्याचा श्वास: निरुपम

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय निरुपम म्हणाले की, “वंदे मातरम हे गीत आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असून ते आता १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी या गीताचा जयघोष करत बलिदान दिले आहे. हे गीत आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. अशा पवित्र गीतावर जर कोणी आक्षेप घेत असेल, तर ती व्यक्ती अंतर्मनातून भारतीय असूच शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी खुशाल हा देश सोडून जावे.”

Mumbai, Maharashtra: On AIMIM chief Asaduddin Owaisi’s remarks on Vande Mataram, Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam says, “…Vande Mataram song is marking its 150th anniversary. It was sung by lakhs of freedom fighters and people who drew inspiration from it during India’s… pic.twitter.com/XFA2wU8t9k — IANS (@ians_india) May 8, 2026

हिंदी भाषेवरून वादाची गरज नाही

हिंदी भाषेच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना निरुपम यांनी स्पष्ट केले की, कोणावरही हिंदी लादली जात नाही. “हिंदी जरी तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रभाषा नसली, तरी ती राजभाषा आणि संवादाची प्रमुख भाषा म्हणून सर्वमान्य आहे. जर सरकारी अधिकाऱ्यांसाठी हिंदी शिकण्याचा प्रस्ताव आला असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे. एखादी नवी भाषा शिकणे हे कधीही फायद्याचेच असते, त्यावर विनाकारण वाद घालणे चुकीचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Mumbai: शिवसेनेत ‘मराठी’ मुद्द्यावरून जुंपली! संजय निरुपमांचा सक्तीला विरोध, सरनाईकांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

काँग्रेस ही ‘सत्तालोभी’ पार्टी

तमिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर निरुपम यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसने कधीही आघाडीचा धर्म पाळलेला नाही, हा त्यांचा इतिहास आहे. तमिळनाडू निवडणुकीत काँग्रेसने डीएमके (DMK) सोबत युती केली, पण तिथे त्यांचा दारूण पराभव झाला. आता अभिनेता विजय एक नवे राजकीय नेतृत्व म्हणून समोर आले आहेत आणि त्यांचा पक्ष डीएमकेच्या विरोधात आहे. असे असतानाही केवळ सत्तेच्या मोहापायी काँग्रेसने आपल्या ५ आमदारांसह त्यांना पाठिंबा जाहीर केला. ही कृती म्हणजे आघाडी धर्माचा अपमान आणि काँग्रेसचा संधीसाधूपणा आहे.”

भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक

सोमनाथ मंदिराचा उल्लेख करताना संजय निरुपम यांनी इतिहासातील जखमांना उजाळा दिला. “आज आपण सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा काळ आठवत आहोत. महमूद गझनवीने हे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त करून लुटले होते. मात्र, आजच्या काळात सोमनाथ मंदिराचा झालेला जीर्णोद्धार आणि विकास हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आणि आत्मसन्मानाचा मोठा पुरावा आहे,” असेही ते म्हणाले.

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Web Title: Sanjay nirupams attack on owaisi and congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • AIMIM
  • Congress
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
3

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.