Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार’, संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य राजकीय होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असं वक्तव्य त्यांनी

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 23, 2025 | 11:50 PM
'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

Follow Us
Close
Follow Us:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य राजकीय होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असं वक्तव्य केल्याने संमेलनाच्या आयोजकांवरही जोरदार टीका झाली. शिवसेना ठाकरे गट त्यासाठी आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी नाराजी व्यक्त करत एक खरमरीत पत्रच साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना लिहीले आहे.  त्यात त्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. संजय राऊत यांनी लिहीलेले पत्र जसेच्या तसे.

जय महाराष्ट्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98 वे दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला.

तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी.

नीलम गोहे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले. व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे. असं संजय राऊत यांनी आपल्या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

 

Web Title: Sanjay raut letter to sahitya mandal adhyaksha ushatambe on neelam gorha mercedes statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Mercedes car
  • Neelam Gorhe
  • sanjay raut

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला, ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा
1

एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला, ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका
2

Maharashtra Politics : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका

LPG Gas : “आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग देवळांनातरी गॅस द्या; खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र
3

LPG Gas : “आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग देवळांनातरी गॅस द्या; खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.