Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या काही आमदारांनी भेट न दिल्याच्या चर्चेला महायुतीतील नेत्यांनी फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. काही आमदार इतर कामांसाठी किंवा पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित नसल्याचे सांगत महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 04:06 PM
Chhagan Bhujbal's reaction An offer of 150 crore for delimitation

Chhagan Bhujbal's reaction An offer of 150 crore for delimitation

Follow Us
Follow Us:
  • डिलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर दिल्याचा दावा
  • संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
  • महायुतीतील एकजुटीवर केले वक्तव्य 
Chhagan Bhujbal on 150 crore offer for delimitation : नाशिक : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला अर्थात डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्यासाठी खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटाने या बिलाला पाठिंबा दिल्याने राऊतांच्या वक्तव्यावर जास्त चर्चा रंगली आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत ठोस पुरावे समोर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर स्पष्ट मत मांडले आहे. तसेच संजय राऊतांच्या १५० कोटींच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खासदारांबाबत असे दावे करून काहीही उपयोग नाही. आरोप करायचे असतील, तर त्यासाठी ठोस पुरावे समोर ठेवले पाहिजेत. कोणी म्हणतंय की शंभर कोटी, कोणी म्हणतो दीडशे, कोणी हजार कोटी म्हणतोय, याला काय अर्थ आहे. हे जे असे दावे आहे याला पुरावा नाही. पुराव्याशिवाय केलेल्या दाव्यांवर चर्चा करण्यात अर्थ नाही.”

अशी वक्तव्ये करणे चुकीचे – छगन भुजबळ

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दुष्काळावर भाष्य करताना दिवंगत नेते अजित पवार यांचा अपमान होईल, अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले, ” आनंदराज आंबेडकर हे सुशिक्षित आहेत. दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांबद्दल असे बोलणे योग्य नाही. जे लोक आज आपल्यात नाहीत, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे. आनंदराज आंबेडकर यांचs जे विधान आहे ते आमच्या सारख्याला तरी आवडलेलं नाही.”

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याबद्दल वक्तव्य केले होते. सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले, त्यानंतर सोन्याचा भाव घसरला असे ते म्हणाले. त्यावर भुजबळ यांनी मोदींना पाठिंबा देत, मत मांडले. भुजबळ म्हणाले, “बरोबर आहे ना. त्यांनी त्यावेळी सांगितले होते खरेदी करू नका. आज जवळजवळ वीस, पंचवीस हजार रुपयांनी भाव कमी झाले. जी वस्तुस्थिती त्यांनी आपल्यासमोर मांडली यांची बरोबर आहे,” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या काही आमदारांनी भेट न दिल्याच्या चर्चेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, “काही आमदार वेगवेगळ्या कामांसाठी गेले असतील, तर काहींचे कार्यक्रम आधीच निश्चित झालेले असतील. त्यामुळे या भेटीवरून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे महायुतीचे नेते खंबीर आहेत. महायुती सरकार मजबूत ठेवण्यावर सर्वांचाच भर आहे. त्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे महायुतीत मतभेद निर्माण होतील, असे मला वाटत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Chhagan bhujbal reaction on 150 crore offer for delimitation by sanjay raut political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा
1

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

Supriya Sule : अमोल कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीची चर्चा; सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात स्पष्ट केली भूमिका
2

Supriya Sule : अमोल कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीची चर्चा; सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात स्पष्ट केली भूमिका

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण
3

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…
4

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.