
Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत काहीही बोलतात. कधी निवडणूक आयोगावर कोट्यवधी रुपये घेतल्याचे आरोप करतात, तर कधी न्यायव्यवस्थेवर बोलतात. खासदारांनी त्यांच्या कानात काही सांगितले असेल, तर त्यावरून थेट सर्व खासदारांवर आरोप करणे योग्य नाही. अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाहीला मारक आहेत, असे शिरसाट म्हणाले.
यावेळी त्यांनी पूर्वीच्या ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेचाही उल्लेख केला. आमच्या काळात सरकार जाणार असल्याचे सांगितले जात होते. आता काय झाले? अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला.
पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी चळवळीत काम केले होते. महाराष्ट्राचे नुकसान झाले असून त्यांचा जनसंपर्कही मोठा होता, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाला भाजप नगरसेवक उपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरही शिरसाट यांनी भाष्य केले. भाजपचे नगरसेवक या कार्यक्रमात सहभागी झाले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार असल्याचे सांगताना सायकल, मशीन आणि शिधा वाटपाचा उल्लेख त्यांनी केला. आता रक्तदान मोहीमही राबवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करताना प्रशासनाची पुरेशी माहिती नसल्याने बालिश विधाने केली जात असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. डिसेंबरमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार
Ans: संजय राऊत यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना १५० कोटी रुपयांचा भाव ठरल्याचा दावा केला होता.
Ans: संजय शिरसाट यांनी राऊतांच्या विधानांवर टीका करत खासदारांवर अशा प्रकारचे आरोप करणे लोकशाहीला मारक असल्याचे म्हटले.
Ans: शेतकऱ्यांना सायकल, मशीन आणि शिधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रक्तदान मोहीम राबवण्याची तयारी असल्याचेही नमूद केले.