मुंबई : ऐन महापालिका निवडणुकीच्या (Bmc Election) तोंडावर होत असलेला नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दौऱ्यावरुन विरोधकांकडुन चांगलीच टिका होताना दिसत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठ वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांंना विचारले असता ते म्हणाले, बच्चू कडुंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत त्यांना टोला लगावला
[read_also content=”भाजप आणि मिंधे गट फेल, महापालिका निवडणुकीसाठी मोदींचा दिल्लीऐवजी मुंबईत मुक्काम, संजय राऊत असं का म्हणाले ? जाणून घ्या https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-statement-about-pm-narendra-modi-nrsr-368710.html”]
आमदार बच्चू कडू यांनीकेलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या वरुन संजय राऊत यांनी बच्चु कडुंना टोला लगावला. बच्चू कडू हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी बहुतेक भाजपचे आमदार प्रवेश करणार असतील. बच्चू कडू बोलतात ते बरोबर आहे, असा टोला लगावला.
शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde group) बंड केल्यानंतर राज्यात संत्तातर झाले. भाजपा (BJP) व शिंदे गटाने सरकार स्थापन करुन आता सहा महिने पूर्ण झालेत. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकारी यांना गळास लावण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, आता शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे, त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात म्हणजे पुढील काही दिवसात १५ ते २० आमदार शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले. एकिकडे राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
[read_also content=”देशात प्रथमच जम्मू-काश्मीरमधे सापडला लिथियमचा साठा! इलेक्ट्रिक वाहनासह मोबाईल बनवण्यास उपयोगी, आतापर्यंत ऑस्ट्रेलिया-अर्जेंटिना येथून होत होता आयात https://www.navarashtra.com/india/for-the-first-time-in-the-country-lithium-stock-found-in-jammu-kashmir-useful-for-making-electric-vehicles-mobile-nrps-368709.html”]