Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या काँग्रेस शिष्टमंडळात अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश होता.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 19, 2025 | 01:41 PM
Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा
  • काँग्रेसच्या शिष्टमंडळाची शरद पवारांसोबत बैठक
  • काँग्रेसला नकोय शरद पवार–ठाकरे बंधू युती
Local Body Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी, विशेषतः बीएमसी निवडणुकांपूर्वी, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ विरोधी महाविकास आघाडी युतीतील इतर दोन पक्षांपासून वेगळे होऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचवेळी काँग्रेसचा राष्ट्रवादीशी तुर्तास तरी कोणताही संघर्ष नाही. पण यामुळे महाविकास आघाडीतील या दुराव्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

अशातच महाविकास आघाडीच्या वर्तुळात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई काँग्रेसचे एक शिष्टमंडळ बीएमसी निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, सिल्व्हर ओक येथे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या काँग्रेस शिष्टमंडळात अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश होता. ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी युतीच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी झाल्याचे मानले जाते.

काँग्रेसला शरद पवार–ठाकरे बंधू युती नको आहे का?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक शक्यतांना उधाण आले आहे. या भेटीमागे काही महत्त्वाचे राजकीय संकेत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस काही महत्त्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत युती कायम ठेवू इच्छित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?

महाविकास आघाडीतील गोंधळ वाढतोय?

काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची स्वतंत्र युती आपल्या सहभागाशिवाय तयार होऊ नये, अशी भूमिका असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेस शरद पवारांवरही ठाकरे गटापासून अंतर ठेवण्याचा दबाव आणतील, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

काँग्रेस स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय बदलेल का?

महापालिका निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा काँग्रेसने वारंवार केली आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो. अशा स्पष्ट भूमिकेनंतर काँग्रेस शरद पवारांसोबत युती करण्याचा विचार का करते?
काँग्रेस आपला स्वतंत्र लढतीचा निर्णय मागे घेण्यास तयार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

शरद पवार ठाकरे बंधूंना सोडून देतील का?

या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्ष महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती करून लढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे  शरद पवार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीपासून दूर जातील का,  असा एक महत्त्वाचा प्रश्न  विचारला जात आहे.

अधिकृत भूमिका अद्याप अस्पष्ट

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेसचे कोणतेही वरिष्ठ नेते आजवर महाविकास आघाडीच्या भविष्यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडलेली नाही. परिणामी, विरोधी आघाडीतील अस्पष्टता आणि गोंधळ अधिकच वाढला आहे.

 

Web Title: Local body election congress leaves uddhav thackerays side sharad pawars ncp takes a cautious stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • BMC Election
  • Congress
  • Local Body Election
  • Sharad Pawar NCP

संबंधित बातम्या

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
1

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
2

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
3

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
4

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.