जुन्नरमध्ये छगन भुजबळ व अमोल कोल्हे यांची एकत्रित खलबतं (फोटो - सोशल मीडिया)
अधिवेशनानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगितले. ते म्हणाले, “अमोल कोल्हेही या कार्यक्रमासाठी आले होते, त्यांच्याशी माझे बोलणे झाले. मात्र आजच्या कार्यक्रमाबाबतच चर्चा झाली. तसेच अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली.”
सध्यातरी विलिनीकरण होईल असं वाटत नाही – भुजबळ
सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असताना या दोन नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता असल्याबद्दल विचारत भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी विलिनिकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, त्याबाबत तिथे काय चर्चा करणार असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच सध्यातरी विलिनीकरण होईल असं वाटत नाही,” असे महत्त्वाचे विधानही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे यांनीही अधिवेशनानंतर माध्यमांशी संवाद साधला. अमोल कोल्हे म्हणाले, “अजित पवार होते तेव्हा चर्चाच झाली नाही असं काही लोक म्हणत होते, मात्र आता ते अचानक चर्चा झाल्याचं सांगत आहेत. आता त्या लोकांना अचानक हे का बोलायला लागलं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत आमच्याकडे तशा कोणत्याही चर्चा सुरु नाहीत.”
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनावरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. याबाबत अमोल कोल्हे म्हणाले, “काँग्रेसमध्ये जाणार असं रोहित पवारांनी माध्यमांना सांगितलं आहे का? चर्चा काहीही घडवता येतात. स्वतः रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत धडाडीने विरोधकांची भूमिका मांडत आहेत. लगेच त्यावरुन काही अर्थ काढणे चुकीचे आहे. रोहित पवारांकडून महाराष्ट्राला आशा आहेत. ते युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे अशी चर्चा आहे म्हणत त्यांच्यावर टॅग लावू नये.”
Ans: अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांची भेट जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात झाली.
Ans: छगन भुजबळ यांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये अधिवेशनातील कार्यक्रमाबाबत तसेच अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
Ans: छगन भुजबळ यांनी सध्यातरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होईल, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.






