Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saswad News: सासवड-वाघापूर रस्त्यावर मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धसक्याने बेकायदेशीर कृत्य?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची पुरंदर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली असून बेकायदेशीर धंदे करणारांचे धाबे चांगले दणाणले आहेत. काही दिवसापर्यंत पुणे जिल्ह्यासह विविध भागात प्रसिद्ध असणारा सासवडचा मावा पान टपरीत मिळेनासा झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 04:49 PM
Saswad News, Purandar, Expired Medicines, Tukaram Mundhe FDA,

Saswad News, Purandar, Expired Medicines, Tukaram Mundhe FDA,

Follow Us
Follow Us:
  • सासवड वाघापूर रस्त्यावर पारगाव खिंडीत कच्च्या रस्त्यालगत मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा
  • आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची पुरंदर तालुक्यात मोठी दहशत निर्माण
  • पुरंदर तालुक्यातील सासवड वाघापूर रस्त्यावर पारगाव खिंडीत एका झुडपात सदर औषधांचा साठा
Saswad News: पुरंदर तालुक्यातील सासवड वाघापूर रस्त्यावर पारगाव खिंडीत कच्च्या रस्त्यालगत मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा आढळून आला आहे. वास्तविक पाहता औषधांची मुदत संपल्या नंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची असते. मात्र अशा बेकायदेशीर पद्धतीने कचऱ्यात प्रचंड प्रमाणात साठा टाकून प्रदूषणाला एक प्रकारे निमंत्रण दिल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बेकायदेशीर मुदतबाह्य औषधे टाकलेल्या व्यक्तीचा शोध घेवून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे यांनी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यात सोनोरी आणि बोपगाव मध्ये मोठ्या कारवाया केल्या होत्या. यामध्ये लाखो रुपयांचे सडके आंबे आणि मुदत संपलेला साठाही नष्ट करून व्यवसायाचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर काही दिवसातच सासवड पोलिसांनी बोपगावमध्ये पुन्हा एकदा छापा टाकून तब्बल २२ लाखांचा गुटखा जप्त करून बेकायदेशीर धंदेवाल्यांना मोठा दणका दिला होता.

Breaking: गुजरात ATSची मोठी कारवाई: गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची पुरंदर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली असून बेकायदेशीर धंदे करणारांचे धाबे चांगले दणाणले आहेत. काही दिवसापर्यंत पुणे जिल्ह्यासह विविध भागात प्रसिद्ध असणारा सासवडचा मावा पान टपरीत मिळेनासा झाला आहे. विमल आणि वेगवेगळा गुटखा विकणाऱ्या लोकांनी जागा मिळेल तिथे टाकून नष्ट केला आहे. काहींनी बाहेर बोभाटा होईल म्हणून घरातच जळून नष्ट केला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या औषधांकडे लक्ष केंद्रित केले असून औषधांची कडक तपासणी सुरु केली आहे. याचा धसका घेत एका व्यक्तीने मुदत संपलेली लाखो रुपयांची औषधे रस्त्यालगत टाकून दिलेली नुकतीच आढळून आली आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड वाघापूर रस्त्यावर पारगाव खिंडीत एका झुडपात सदर औषधांचा साठा आढळून आल आहे. या मध्ये चेहऱ्याला लावायच्या शेकडो स्क्रीमच्या डब्या आणि बाटल्या, वेगवेगळी औषधे, टेबलेटची पाकिटे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या औषधांचा साठा आढळून आला आहे.

Mumbai High Court: भाजप सरकार मुर्दाबाद म्हटल्याने कोणी तडीपार होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा

सध्या पावसाळ्याचे दिवस असून सदर औषधे भिजल्यानंतर त्याचे प्रदूषण होणार आहे. रस्त्याने येणारे जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. तसेच जनावरांनी खाल्यास त्यानाही त्याचा त्रास होणार आहे. अशी परिस्थिती असताना बेकायदेशीरपणे एवढ्या प्रचंड प्रमाणात औषधे कोणी टाकली आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रस्त्यावर औषधे टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी – ग्राहक कल्याण फाऊंडेशन

ज्या ठिकाणी मुदतबाह्य औषधे बेकायदेशीरपणे टाकून दिली आहेत. त्या ठिकाणापासून जवळच पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे यांचे निवासस्थान असून त्यांनी या घटनेचा जोरदार निषेध केला आहे. नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा कोण प्रयत्न करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित करून संबंधित व्यक्तीचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामदास मेमाणे यांनी केली आहे.

Web Title: Saswad news huge stock of expired medicines dumped on waghapur road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Purandar
  • Saswad News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार
1

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित
2

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!
3

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.