Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा : क्रांतीसिंहांच्या विचारांतून सामाजिक ऐक्याचा संदेश युवकांनी परिवर्तनाची धुरा उचला १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले होते. स्वराज्याची लोकाभिमुख व्यवस्था उभी करत स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. अन्यायाविरोधातील संघर्ष, सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्यांचा वारसा आजही प्रेरणादायी मानला जातो."

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 03, 2026 | 09:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • क्रांतीसिंहांच्या विचारांतून सामाजिक ऐक्याचा संदेश
  • युवकांनी परिवर्तनाची धुरा उचला
सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासह सामाजिक ऐक्य, लोकसंघटन आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत युवकांनी लोकशाही, समता आणि संविधानिक मूल्यांवर आधारित जनजागृतीची भूमिका स्वीकारावी, असे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर महापालिकेची नजर; स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
राजवाडा परिसरातील सर्व श्रमिक संघ व सातारा म्युनिसिपल कामगार युनियन (लाल बावटा) कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र प्रवक्ते कॉ. विजय मांडके यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सातारा जिल्हा समितीचे प्रमुख कार्यकर्ते कॉ. माणिक अवघडे यांनी क्रांतीसिंहांच्या प्रतिसरकार चळवळीचा संदर्भ देत लोकशाही, सामाजिक सलोखा आणि जनतेच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.

युवकांनी समाजात संवाद, संघटन आणि जनजागृतीची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
कॉ. विजय मांडके यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा उल्लेख करत श्रमिक, महिला, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच सर्व समाजघटकांना लोकभाषेत संवाद साधत संघटित करण्याचे आवाहन केले.

Nagpur : पाच वर्षांतच पुलाची वाट लागली! पिवळी नदीवरील ५० मीटर पूल धोकादायक
सुहास पुजारी यांनी सांगली जिल्हा आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ऐतिहासिक संबंध स्पष्ट केले. प्रकाश खटावकर आणि अॅड. विलास वाहगावकर यांनी समविचारी संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची गरज व्यक्त केली. कॉ. विजय निकम यांनी साताऱ्यातील ‘चलेजाव’ चळवळीच्या स्मारकाबाबत माहिती देत ते लवकर पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास कॉ. शंकर पाटील, कॉ. प्रमोद परामणे, कॉ. विजय निकम, सुहास पुजारी यांच्यासह अनिल वीर, शिवाजी माने, आप्पा खंडझोडे, रेखाताई खंडझोडे, सूर्यकांत घोरपडे, जुबेर मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कॉ. प्रमोद परामणे यांनी मानले.

Web Title: Satara 125th birth anniversary of krantisinh a message of transformation for the youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • freedom fighters
  • Maharshtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.