फोटो सौजन्य- गुगल
भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ६६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यापैकी २०४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या २०४ अतिधोकादायक इमारतींपैकी १४३ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. उर्वरित ६१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या पाडणे हाच पर्याय आहे
महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा देऊन घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घरे रिकामी न केल्यास पोलिसांच्या मदतीने इमारती रिकाम्या करून घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. रिकाम्या असलेल्या ६१ अतिधोकादायक इमारती पाडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकेने १५ अतिधोकादायक इमारती पाडल्या आहेत. आता उर्वरित १४३ इमारती रिकाम्या करून घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे.
महापालिका क्षेत्रात आणखी ४५७ इमारती धोकादायक श्रेणीत आहेत. यापैकी ६० इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी त्या पूर्णपणे रिकाम्या करणे आवश्यक आहे. तर ३६१ इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असतानाही दुरुस्ती करता येणे शक्य आहे. अन्य ३६ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. महापालिकेने सर्व ६६१ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे मालक, सचिव आणि अध्यक्षांना नोटिसा बजावून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे निर्देश दिले होते. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतरच संबंधित इमारती धोकादायक किंवा अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
नोटिसा देऊनही आतापर्यंत ५१ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट महापालिकेकडे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता महापालिका पॅनेलवरील आर्किटेक्टमार्फत या इमारतींचे ऑडिट करून घेणार आहे. याचा खर्च सुरुवातीला महापालिका करणार असून, नंतर संबंधित इमारत मालकांकडून वसूल केला जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या इमारत मालकांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, अद्याप एकाही संबंधिताकडून दंड वसूल करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.
इमारती धोकादायक घोषित ६६१
अतिधोकादायक इमारती श्रेणीत २०४
अतिधोकादायक इमारती २०४
इमारतीमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक १४३
अतिधोकादायक इमारती रिकाम्या ६१
Ans: KDMC क्षेत्रात एकूण 661 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत
Ans: स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारतीची मजबुती, सुरक्षितता आणि वापरण्यायोग्यता तपासणारी तांत्रिक प्रक्रिया होय.
Ans: भेगा पडणे, छत गळणे किंवा इमारतीत कंप जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने महापालिकेला कळवून सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक आहे.






